झोमॅटो डिलिव्हरी बॉयची भररस्त्यात हत्या, फूड पार्सल पोहोचवायला जाताना खून

झोमॅटो डिलिव्हरी बॉयची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरियाणातील रेवारी शहरात अन्सल टाऊनशीपमधील सेक्टर 19 मध्ये हा प्रकार समोर आला.

झोमॅटो डिलिव्हरी बॉयची भररस्त्यात हत्या, फूड पार्सल पोहोचवायला जाताना खून
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 8:05 AM

चंदिगढ : फूड पार्सल पोहोचवण्यासाठी निघालेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा (Zomato delivery boy) वाटेतच करुण अंत झाला. झोमॅटो या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. भररस्त्यात गोळी झाडून तरुणाचा खून करण्यात आला. हरियाणातील रेवारी शहरात (Rewari) अन्सल टाऊनशीपमधील सेक्टर 19 मध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हत्या झालेल्या तरुणाचा मोबाईल आणि पाकीटही गहाळ झाले आहेत. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने त्याच्यावर गोळी झाडण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी मॉडेल टाऊन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांसमोर आरोपींना शोधण्याचं आव्हान आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या हत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

झोमॅटो डिलिव्हरी बॉयची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरियाणातील रेवारी शहरात अन्सल टाऊनशीपमधील सेक्टर 19 मध्ये हा प्रकार समोर आला. महेंद्र सिंग (वय 30 वर्ष) असं मयत तरुणाचं नाव असून तो पलवल जिल्ह्यातील हुदिथल गावचा रहिवासी आहो. तो सध्या रेवाडी येथील दुर्गा कॉलनी येथे राहत होता आणि झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. रविवारी रात्री जेवणाची ऑर्डर घेऊन तो अन्सल टाऊनशिपला गेला.

टाउनशिपच्या गेटवरच कोणीतरी त्याच्यावर गोळी झाडली आणि तो जखमी झाला. महेंद्र जखमी अवस्थेत पडल्याचं पाहून एका वाटसरुने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले.

चोरीच्या उद्देशाने हत्येचा संशय

तरुणाच्या पोटात गोळी लागली होती. त्याचे पाकीट आणि मोबाईलही घटनास्थळावरून गायब असल्याचे आढळून आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. रेवारीचे डीएसपी मोहम्मद जमाल म्हणाले, “एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि आम्ही संशयिताला पकडण्यासाठी छापे टाकत आहोत.

संबंधित बातम्या :

मेहुणीला लग्नाचं वचन, बायकोचा मर्डर, महिला पोलिसांशी अनैतिक संबंध, स्त्रीलंपट नवऱ्याला अटक

 हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर, 22 वर्षीय तरुणासह बापालाही संपवलं, पुण्यातील शाळेमागे हत्याकांड

रस्त्यात बाईक अडवली, सासऱ्याला खाली पाडून सून पायावर बसली, निवृत्त पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.