AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेपासूनच प्रेम होतं, लग्नाच्या 8 वर्षानंतर त्याने बायकोसमोर असा प्रस्ताव ठेवला की, तिने…

एका युवकाने शाळेपासूनच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं. लग्न करुन घरी आल्यानंतर मुलीला समजलं की, नवऱ्याच स्पा सेंटर आहे. विवाहाच्या नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. विश्वासाला एकदा तडा गेला की, संसार मोडून पडायला वेळ लागत नाही.

शाळेपासूनच प्रेम होतं, लग्नाच्या 8 वर्षानंतर त्याने बायकोसमोर असा प्रस्ताव ठेवला की, तिने...
massageImage Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 04, 2025 | 12:12 PM
Share

लग्नाच पवित्र नातं परस्पराच्या विश्वासावर टिकून असतं. पण लग्नानंतर तुमच्या पार्ट्नरनेच तुमची फसवणूक केली तर?. हरियाणाच्या पानीपतमध्ये हे प्रकरण समोर आलय. एका युवकाने शाळेपासूनच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं. लग्न करुन घरी आल्यानंतर मुलीला समजलं की, नवऱ्याच स्पा सेंटर आहे. तिथे देह व्यापार चालतो. पण कुटुंबासाठी म्हणून ती गप्प राहिली. लग्नानंतर काही वर्षांनी नवरा त्याच्या मूळ स्वभावावर आला. त्याने पत्नीलाही सोडलं नाही. लग्नानंतर आठ वर्षांनी तो पत्नीला बोलला की, तुलाही आता स्पा सेंटरमध्ये तेच करावं लागेल, जे इतर मुली करतात. पत्नीने त्याला सांगितलं, हे सर्व मी करणार नाही. या बद्दल पोलिसांना सांगेन. त्यानंतर पत्नीने स्पा सेंटरमध्ये छापा मारायला लावला. पत्नीच्या या कृतीने नवरा हडबडला. त्याने पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

पानीपतच्या नलवा कॉलनीतील हे प्रकरण आहे. पतीने पत्नीला जबरदस्तीने विषारी गोळ्या खायला घालून हत्या करण्याचा प्रयत्न केला. इतकच नाही, सासूने सुद्धा या कामात मुलाची म्हणजे नवऱ्याची साथ दिली. सासूने सूनेच तोंड पकडलं व नवऱ्याने जबरदस्तीने 6 गोळ्या तिच्या तोंडात भरल्या.

पतीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध

पती मुजफ्फरनगर येथे स्पा सेंटरच्या आडून देह व्यापाराचा धंदा करतो, असा आरोप पत्नीने केला. तिच्यावर सुद्धा याच व्यवसायात सहभागी होण्यासाठी दबाव टाकत होता. पण पत्नीने नकार दिला आणि स्पा सेंटरवर रेड मारायला लावली. यावर नाराज झालेल्या पती आणि सासूने सूनेची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पानीपत येथील रुग्णालयात दाखल असलेल्या पत्नीने पतीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला.

पत्नीच्या भावाने काय सांगितलं?

पत्नीच्या भावाने सांगितलं की, या घटनेनंतर भावोजी मला भेटण्यासाठी इथे आले होते. प्रकरण इथेच मिटवा नाहीतर मला तुरुंगात जावं लागेल अशी धमकी त्यांनी दिली. पीडितेच्या भावाने सांगितलं की, तक्रारीनंतर FIR नोंदवण्यात आला आहे. पण आरोपीला अजून अटक झालेली नाही. आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आम्ही अंबाला येथे जाऊन अनिल विज यांची सुद्धा भेट घेऊ, असं पत्नीच्या भावाने सांगितलं.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.