असं काय घडलं की युवक आई-वडील आणि आजीच्या जीवावर उठला?, लहान मुलगा आला नि खुलासा झाला

आरोपीचे वडील उच्च माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांना मारून त्यांच्या अनुकंपा जागेवर त्याला नियुक्ती हवी होती. यासाठी त्याने तिघांना मारण्याचा प्लान केला.

असं काय घडलं की युवक आई-वडील आणि आजीच्या जीवावर उठला?, लहान मुलगा आला नि खुलासा झाला
प्रियकराकडून प्रेयसीच्या कुटुंबावर गोळीबार
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 6:56 PM

रायपूर : सरायपायली ब्लॉकच्या पुटका येथील रहिवासी प्रभात भोई (वय ५२) हे उच्च माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक होते. प्रभात यांना दोन मुलं आहेत. मोठा उदीत (वय २४) आणि लहान अमित. अमित रायपूरच्या पंडित जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस करत होता. उदीत हा बेरोजगार होता. आपल्या आईवडिलांना नेहमी पैसे मागत होता. पैसे न मिळाल्यास वाद घालत होता. पैसे मिळाले नाही म्हणून उदीतने आधी आपल्या वडिलांचा खून करून त्याजागी अनुकंपा नोकरी मिळवण्यासाठी प्लान केला. घरी आई झरना भोई (वय ४७) आणि आजी सुलोचना (वय ७५) होती. या दोघे त्याच्या प्लानमध्ये अडचण ठरत होत्या.

छत्तीसगड पोलिसांनी एका युवकाला त्याची आई, वडील आणि आजीच्या हत्येप्रकरणी अटक केली. आरोपी युवकाने तिघांनाही हॉकी स्टीकने मारले आणि सॅनीटायझरने मृतदेह जाळून घरातील वाड्यात पुरला. आरोपीचे वडील उच्च माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांना मारून त्यांच्या अनुकंपा जागेवर त्याला नियुक्ती हवी होती. यासाठी त्याने तिघांना मारण्याचा प्लान केला.

हे सुद्धा वाचा

रात्री तिघेही झोपले होते. उदीतने हॉकी स्टीकने तिघांवर वार केला. खून केल्यानंतर तिघांचे मृतदेह घरी लपवून ठेवले. फिनाईलने संपूर्ण घर स्वच्छ केले. तिन्ही मृतदेहांना सॅनेटाईझर टाकून जाळले.

तिघांना मारून बेपत्ता असल्याची तक्रार

१२ मे रोजी आई-वडील आणि आजी बेपत्ता असल्याची तक्रार केली. ८ मे रोजी तिघेही उपचारासाठी रायपूरला गेले होते. तेथून अद्याप आले नाही, अशी तक्रार केली.

शेजाऱ्यांना संशय

तिघांच्या हत्यानंतर उदीत बेहिशोबी खर्च करू लागला. चार दिवसांत पलंग, आलमारी, एसी, मोबाईल अशा वस्तू खरेदी केल्या. यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. याची माहिती शेजाऱ्यांनी लहान मुलाला दिली.

लहान मुलगा अमित पुटका येथे आला. घराच्या मागच्या भागात जळल्याचे निशाण सापडले. राख हटवल्यानंतर त्याला हाडं दिसली. घराची तपासणी केली असता रक्ताचे डाग दिसले. खड्ड्यातून राखही सापडली. त्याने पोलिसांना बोलावले. पोलिसांना मोठ्या मुलावर संशय आला. विचारपूस केल्यानंतर त्याच्याकडून हॉकी स्टीक, सॅनिटायझर लायटर जप्त करण्यात आले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.