Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कदम रुग्णालयाविरोधात गैरकारभार, अनियमिततेची आरोग्य विभागाची तक्रार, डॉक्टरांविरोधात गुन्हे

रुग्णालयच्या परिसरातून कवट्या आणि हाडे आढल्यावर एकच खळबळ माजली होती. दरम्यान पोलिसांनी रुग्णालयात आढळलेल्या अनियमितता आणि गैरकारभार संदर्भात आरोग्य विभागाला तक्रार दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या.

कदम रुग्णालयाविरोधात गैरकारभार, अनियमिततेची आरोग्य विभागाची तक्रार, डॉक्टरांविरोधात गुन्हे
कदम रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 6:03 PM

वर्धा : आर्वी येथील कदम रुग्णालयाच्या (Kadam hospital) परिसरातून पोलिसांनी गर्भापाताचे (Abortion case) रहस्य उलगडून काढले. याच प्रकरणाच्या तपासदरम्यान वेगवेगळे खुलासे समोर येत आहे. रुग्णालयच्या परिसरातून कवट्या आणि हाडे आढल्यावर एकच खळबळ माजली होती. दरम्यान पोलिसांनी रुग्णालयात आढळलेल्या अनियमितता आणि गैरकारभार संदर्भात आरोग्य विभागाला तक्रार दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. चार दिवस उलटूनही या प्रकरणात आरोग्य विभागाने तक्रार दाखल केली नव्हती. या बाबत टीव्ही 9 ने बातमी दाखवताच सोमवारी रात्री आर्वीच्या वैद्यकीय अधीक्षकांनी आर्वी पोलिसांत तक्रार दाखल केलीय. या तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी डॉक्टर रेखा कदम, डॉक्टर नीरज कदम, डॉक्टर शैलजा कदम आणि डॉ कुमारसिंग कदम यांच्यावर विविध कलमन्वये गुन्हा दाखल केला आहे. आर्वी पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 409, महाराष्ट्र रुग्णपरिचर्या घरे नोंदणी कायदा कलम 12,महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमन 1965च्या कलम 29, वैद्यकीय गर्भपात अधिनियमन 1971च्या कलम (2), पर्यावरण (संरक्षण) अधिनियमन 1986च्या कलम 15 आणि औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसाधान अधिनियमन 1940 च्या कलम 27 नुसार कदम रुग्णालयाच्या चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन आरोपी डॉक्टर रेखा कदम आणि डॉक्टर नीरज कदम हे पहिलेच पोलिसांच्या ताब्यात असून डॉक्टर कुमारसिंग कदम आणि डॉक्टर शैलजा कदम या दोघांना लवकरच अटक केली जाणार आहे.

आर्वी पोलिसांकडून लैंगिक अत्याचारसह गर्भापाताचा तपास केला जात होता याच दरम्यान दवाखान्याचा गैरकारभार समोर आला. आता यावर आरोग्य विभागने सुद्धा ऍक्शन मोड मध्ये येत तक्रार दिली. आर्वीच्या वैद्यकीय अधिक्षकांनी दिलेल्या तक्रारीत रुग्णालयाच्या अनेक बाबी समोर आल्या.

आरोग्य विभागाच्या तक्रारीत काय?

बॉम्बे नर्सिंग होम ऍक्टनुसार अनियमितता आढळून आली. रुग्णालयामध्ये ०७ बेड आढळून आले. पण प्रत्यक्षात प्रस्तावामध्ये ०५ बेडची मागणी केल्याचे दिसून येते. डॉ. रेखा निरज कदम यांचे MS (Gynae) चे MMC रजिस्ट्रेशन आढळून आले नाही. पी.सी.पी.एन.डी.टी. ऍक्टनुसार अनियमितता आढळून आली. Form F मध्ये सोनोग्राफीचे कारणे नमुद केल्याचे आढळून आले नाही. एम.टि.पी. ऍक्टनुसार अनियमितता आढळून आली. सदर तक्रारीच्या अनुसार मुलीच्या बाबतीत एमटीपी केल्याबाबतचा रेकॉर्ड तसेच सोनोग्राफी केल्याचा अहवाल आढळून आलेला नाही. बायोमेडीकल वेस्ट मॅनेजमेंट मध्ये अनियमितता आढळून आली. ओपीडी लेबर रूम मध्ये बायोमेडीकल वेस्ट बकेट आढळून आल्या नाही तसेच सदर मुलीचा गर्भपाताची विल्हेवाट कश्याप्रकारे लावली याबाबत पण दस्तऐवज आढळून आला नाही. डॉ. कदम हॉस्पिटल येथे विविध ठिकाणी कालबाहय औषधी तसेच शासकीय औषधे, ऑक्सिटोसीन इंजेक्शनचे 90 नग, माला एन गर्भनिरोधक औषधीचे 23 बॉक्स (मुदतबाहय ) ज्यामध्ये 71764 गोळया आढळून आल्या आहे. एवढाच नव्हे तर डॉक्टर नीरज कदम हे आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात 50 हजार रुपये मानधन तत्वावर जानेवारी 2018 पासून स्त्री रोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. घटनेच्या चार दिवसांनांतर का होईना आरोग्य विभागाला या प्रकरणात जागी आली असून तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणात आणखी काय समोर येते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Aurangabad: वैजापुरात भरदिवसा दोन लाखांची रोकड लंपास, महावितरणच्या वाहनावर चोरट्यांचा डल्ला!

लिफ्ट देण्याचा बहाणा! ट्रकमध्ये बसवून आळीपाळीनं बलात्कार, नंतर प्रेत नदीत फेकलं

2 दिवसांपूर्वी स्कॉर्पिओच्या अपघातात तिघे दगावले! आता एकाला ट्रकनं चिरडलं, सोलापुरात अपघातांची मालिका

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.