Ulhasnagar Crime : भाचीच्या वाढदिवसाला आला अन् सहा घरफोड्या केल्या! ‘पाहुण्या’ घरफोड्याला थेट कोठडीचा पाहुणचार

यात हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी त्यांनी केली. मात्र अचानक वाढलेलं घरफोड्यांचं प्रमाण पाहून पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी या टोळीला बेड्या ठोकल्या.

Ulhasnagar Crime : भाचीच्या वाढदिवसाला आला अन् सहा घरफोड्या केल्या! 'पाहुण्या' घरफोड्याला थेट कोठडीचा पाहुणचार
भाचीच्या वाढदिवसाला आला अन् सहा घरफोड्या केल्या!Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 10:00 PM

उल्हासनगर : भाचीच्या वाढदिवसासासाठी नांदेडहून आलेल्या एका चोरट्यानं उल्हासनगरात अवघ्या 4 दिवसात तब्बल 6 घरफोड्या (Robbery) केल्याचं उघडकीस आलं आहे. या चोरट्यासह एकूण तिघांना उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजू मिरे, परमेश्वर गायकवाड आणि प्रकाश पवार अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटारसायकल असा एकूण 12 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत (Seized) केलाय. आरोपींसोबत एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलं असून त्यांचे इतर दोन साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. यापैकी राजू मिरे याच्याविरोधात यापूर्वी तेलंगणा राज्यातील अदिलाबाद आणि नांदेड येथे सात गुन्हे दाखल आहेत.

अवघ्या चार दिवसात सहा घरफोड्या केल्या

उल्हासनगर परिमंडळ 4 मध्ये जुलै महिन्यात घरफोड्यांचं प्रमाण वाढलं होतं. त्यात 15 ते 18 जुलै या अवघ्या 4 दिवसात उल्हासनगरच्या हिललाईन, विठ्ठलवाडी आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे 6 गुन्हे घडले. पोलिसांकडून या घरफोडी करणाऱ्यांचा कसून शोध घेतला जात होता. या प्रकरणात पोलिसांनी राजू मिरे, परमेश्वर गायकवाड आणि प्रकाश पवार या तिघांना सापळा रचून अटक केली. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीने पोलिसही अचंबित झाले. कारण यापैकी राजू मिरे हा मूळचा नांदेडचा राहणारा असून त्याची बहीण अंबरनाथ तालुक्यातल्या नेवाळी परिसरात वास्तव्याला आहे. या बहिणीच्या मुलीचा वाढदिवस असल्यानं राजू हा नांदेडहून नेवाळी परिसरात आला होता. मात्र इथं येताच त्यानं परमेश्वर गायकवाड, प्रकाश पवार आणि अन्य दोन साथीदारांच्या मदतीने थेट घरफोड्या करायला सुरुवात केली. यात हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी त्यांनी केली. मात्र अचानक वाढलेलं घरफोड्यांचं प्रमाण पाहून पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी या टोळीला बेड्या ठोकल्या. (Hillline Police arrested three accused of burglary in Ulhasnagar)

हे सुद्धा वाचा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.