रंग पंचमीच्या दिवशी भांगेमुळे पती-पत्नीचा बाथरुममध्ये मृत्यू? घाटकोपरमधील धक्कादायक घटना
रंग पंचमी खेळून आल्यानंतर दोघे एकत्र आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले होते. दीपक आणि टीना मित्र परिवारासमवेत रंग पंचमी खेळण्यासाठी विलेपार्ले येथे गेले होते. संध्याकाळी 4.30 च्या सुमारास रंग पंचमी खेळून हे जोडपं घरी परतलं.
मुंबई : चार दिवसांपूर्वी घाटकोपर येथील फ्लॅटमध्ये एक जोडपं मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दीपक शाह (44) आणि टीना शाह (38) असं मृत पती-पत्नीच नाव आहे. सोमवारी होळीचा सण झाला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी रंग पंचमी होती. मंगळवारी दीपक आणि टीना मित्र परिवारासमवेत रंग पंचमी खेळण्यासाठी विलेपार्ले येथे गेले होते. संध्याकाळी 4.30 च्या सुमारास रंग पंचमी खेळून हे जोडपं घाटकोपरच्या कुकरेजा टॉवरमधील आपल्या घरी परतलं. रंग पंचमी खेळून आल्यानंतर आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेलं हे जोडपं बाहेर आलच नाही. बुधवारी दोघांचे मृतदेह बाथरुममध्ये सापडले.
दीपक आणि टीनाने मृत्यूच्या आधी उलटी केली होती. गिझर सुरु असल्यामुळे दोघांवर वरुन पाण्याचा प्रवाह सुरु होता. दीपक आणि टीनाच्या मृत्यूबद्दल वेगवेगळी थिअरी मांडणात येत आहे. भांग किंवा दारुमधून त्यांच्यावर विष प्रयोग करण्यात आल्याची सुद्धा एक शक्यता आहे. जोडप्याचे अवयव तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे.
उल्टीचे नमुने घेतले
घटनास्थळावरुन गोळा करण्यात आलेले उल्टीचे नमुने, त्याशिवाय पोटातील घटकांच रासायनिक विश्लेषण करण्यात येईल. बिल्डिंगमधील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासण्यात येईल. या सगळ्या तपासातून नेमंक काय घडलं? ते समजून शकत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
20 तास दोन्ही मृतदेह पाण्यामध्ये
परिस्थितीजन्य जे पुरावे आहेत, त्यानुसार घरी परतल्यानंतर दोघांना उल्टीचा त्रास सुरु झाला. त्यांनी घातलेले कपडे रंगाने माखलेले होते. दुसऱ्यादिवशी बुधवारी त्यांचे मृतदेह आढळले, त्यावेळी शॉवर सुरु असल्यामुळे त्याच्या शरीरावर अविरत पाण्याचा प्रवाह सुरु होता. जवळपास 20 तास दोन्ही मृतदेह पाण्यामध्ये होते. पहिल्या पत्नीला चौकशीसाठी बोलावल
दीपक शाहच हे दुसर लग्न होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोन वर्षांपूर्वी त्याने दुसरं लग्न केलं. पहिल्या विवाहापासून त्याला दोन मुलं आहेत. पोलिसांनी त्याच्या पहिल्या पत्नीला चौकशीसाठी बोलावल होतं. या जोडप्याला ज्यांनी कॉल केले, त्यांची जबानी नोंदवण्यात आली आहे.