अंघोळ करताना विद्यार्थीनीचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न… वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार; मुंबई हादरली
मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी अंघोळ करत असताना तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला अटक केली.
मुंबई | 7 डिसेंबर 2023 : मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी अंघोळ करत असताना तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे मोठी खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ही घटना घडली. 27 वर्षांची ही तरूणी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये एक कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती पुन्हा हॉस्टेलवर गेली आणि अंघोळ करून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. तेथे महिला आणि पुरूषांची बाथरूम्स ही बाजूलाच, लागून आहेत.
अंघोळ करायला गेली पण तेवढ्यात
अंघोळीसाठी ती बाथरूममध्ये गेली तेवढ्यात त्या रुग्णालयात रोजंदारीवर काम करणारा कर्मचारी बाथरूमच्या भिंतीवरून चढला आणि डोकावून पाहू लागला. त्याची चाहूल लागताच मुलीने वर पाहिले तर तिला तो कर्मचारी दिसला. भेदरलेल्या मुलीने लगेचच बचावासाठी आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाजा ऐकून कोणी यायच्या आतच तो पळून गेला.
पीडित तरूणीने बाहेर आल्यावर हॉस्पिटलच्या डीनच्या कानावर ही गोष्ट घाकली आणि त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आला आहे