AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Human Hair Smuggling : काय माणसांच्या केसाचीही तस्करी? बीएसएफकडून सव्वाशे किलो केसाची खेप जप्त, बांग्लादेश बॉर्डरवर कारवाई

28 एप्रिल रोजी बीएसएफच्या मेघालय सीमेवरील जवानांनी मेघालयातील पूर्व खासी हिल्सच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून बांगलादेशमध्ये तस्करी करण्यासाठी निघालेले 125 किलो मानवी केस जप्त केले. एवढेच नाही तर बीएसएफने मेघालयातील पूर्व जयंतिया हिल्सच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून 73 गुरांची सुटका केली.

Human Hair Smuggling : काय माणसांच्या केसाचीही तस्करी? बीएसएफकडून सव्वाशे किलो केसाची खेप जप्त, बांग्लादेश बॉर्डरवर कारवाई
बीएसएफकडून सव्वाशे किलो केसाची खेप जप्त, बांग्लादेश बॉर्डरवर कारवाईImage Credit source: tv9
| Updated on: Apr 29, 2022 | 4:29 PM
Share

मेघालय : सीमाभागात (India Bagladesh Border) सध्या मोठ्या प्रमाणात तस्करी वाढली आहे. खासकरून भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर तस्करीला (Smuggling) उत आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्या जवांनी तस्करीसाठी घेऊन निघालेल्या सोन्याचा मोठा साठा जप्त केला होता. आता तर तस्करीचा भलताच प्रकार समोलर आला आहे. आजपर्यंत आपण केसात लपवून अनेक पदापर्थांची किंवा सोन्याची तस्करी झाल्याचे पाहिले आहे. मात्र आता मेघालय सीमेवर चक्क केसांची तस्करी (Hair Smuggling) होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही तस्करी ही मानवी केसांची आहे. बीएसएफच्या जवांनांनी वेळीच धाड टाकून तस्करांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. 28 एप्रिल रोजी बीएसएफच्या मेघालय सीमेवरील जवानांनी मेघालयातील पूर्व खासी हिल्सच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून बांगलादेशमध्ये तस्करी करण्यासाठी निघालेले 125 किलो मानवी केस जप्त केले. एवढेच नाही तर बीएसएफने मेघालयातील पूर्व जयंतिया हिल्सच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून 73 गुरांची सुटका केली.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

तस्करी रोखण्याचे जवानांपुढे आव्हान

बांगलादेशात तस्करीच्या मानवी केसांचा वापर घरगुती वापरासाठी, तसेच निर्यातीसाठी, विग बनवण्यासाठी केला जातो. जानेवारी 2022 पासून BSF मेघालयने 225 किलो पेक्षा जास्त मानवी केस जप्त केले आहेत. शिवाय बीएसएफ मेघालयने पूर्व जैंतिया हिल्सच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून 73 गुरांची सुटका केली. त्यांची बांगलादेशात तस्करी करण्यासाठी तस्करांच्या काही गटांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र त्यांचे हे प्रयत्न लष्कराने पुन्हा हाणून पाडले आहेत. एप्रिल 2022 मध्ये बीएसएफ मेघालयने एकूण 450 गुरे सोडवली आहेत. तसेच तस्करीच्या वाढत्या प्रयत्नांमुळे बीएसएफने राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यासाठी तसेच सर्व प्रकारचे सीमापार गुन्हे आणि बेकायदेशीर हलचाली रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेवर सतर्कता वाढवली आहे.

सीभागातील तस्करी वाढली

गेल्या अनेक दिवसांत सीमेवर वाढलेले तस्करीचे प्रमाण हे सैन्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. काही वेळेला तस्कर नेपाळ सीमेचाही आधार घेताना दिसून येत आहेत. या तस्करीमुळे सीमाभागातील शांतता भंग होऊ शकते. तसेच याच्या माध्यमातून काही बाहेरील लोकही भारतात घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैन्य चांगलेच अलर्ट मोडवर आले आहे. सीमाभागत सैन्याकडून चोख नाकाबंदी लावण्यात येत आहे. तसेच सीमाभागातील हलचालींवर सैन्य बारीक नजर ठेवून आहे. त्यामुळे आगामी काळात या तस्करीला आळा बसेल अशी अपेक्षा आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.