Beed Couple Death : पाणी गरम करताना हिटरचा शॉक लागला, पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

ज्ञानेश्वर यांनी स्वतः फिटरची पिन बोर्डाला लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना विद्युत शॉक लागला आणि ते ओरडू लागले. पतीचा ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नीला जाग आली आणि तिने पतीकडे धाव घेतली.

Beed Couple Death : पाणी गरम करताना हिटरचा शॉक लागला, पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
हिटरचा शॉक लागून जोडप्याचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 2:21 PM

बीड : अंघोळीचं पाणी गरम करताना वीजेचा शॉक लागून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. पतीला शॉक लागला म्हणून वाचवायला गेलेल्या पत्नीचाही शॉक लागून मृत्यू झाला. केज तालुक्यातील पिंपळगाव येथे ही घटना घडली. ज्ञानेश्वर सुरवसे आणि इंदूबाई सुरवसे असे मयत पती-पत्नीचे नाव आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ज्ञानेश्वर सुरवसे आणि इंदूबाई सुरवसे हे नेहमीप्रमाणे बुधावरी पहाटे 4 वाजता उठले. मग अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी हिटर चालू करण्यासाठी गेले. हिटर चालू करत असताना त्यांना वीजेचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पतीला वाचवताना पत्नीचा दुर्दैवी अंत

सध्या थंडीचे दिवस आहेत आणि त्यातच महावितरणचा सावळा गोंधळ केज परिसरात काही गावात पहाटेच्या पाच वाजेच्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो. त्याआधीच शेतात जाण्यासाठी ज्ञानेश्वर सुरवसे हे चार वाजता आंघोळीसाठी उठले, यावेळी पत्नी झोपत होती.

हे सुद्धा वाचा

ज्ञानेश्वर यांनी स्वतः फिटरची पिन बोर्डाला लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना विद्युत शॉक लागला आणि ते ओरडू लागले. पतीचा ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नीला जाग आली आणि तिने पतीकडे धाव घेतली.

आई-वडिलांच्या निधनाने 10 वर्षांचा मुलगा अनाथ

पतीला वाचवताना तिलाही वीजेचा शॉक लागला आणि जागीच दोघांचा करुण अंत झाला. दहा वर्षाचा मुलगा मात्र गाढ झोपेत होता. काही वेळाने त्याला जाग आली तेव्हा आई आणि वडिल मृत पावल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने एकच हंबरडा फोडला.

या प्रकरणाची माहिती केज पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. केज ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलीस नाईक उमेश आघाव, पोलीस नाईक बाळराजे सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

दोन वर्षापूर्वी मुलीचा अपघाती मृत्यू

तीन मुले आणि दोघे असा पाच जणांचे हे शेतकरी कुटुंब होते. दोन वर्षांपूर्वी 14 वर्षाची मुलगी शेतातल्या विहिरीत पाणी काढताना मृत्युमुखी पडली होती. त्या मुलीचं दुःख पचविण्याआधीच आता दोघा पती-पत्नीचा मृत्यू झाला.

मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे. आता छोटा दहा वर्षाचा मुलगा मात्र एकाएकी पडला आहे. डोक्यावरचं छत्र हरवलेलं दहा वर्षाचा मुलगा शोकाकुल झाला आहे. गावातल्याच स्मशानभूमीत दोघा पती-पत्नीवर अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी संपूर्ण गाव धाय मोकलून रडत होते.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.