दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नी माहेरी गेली, पतीने गंभीर जखमी केली; महिलेसोबत काय घडले ?
पतीच्या मारहाणीला कंटाळून अखेर पतीला सोडून दक्षता तिच्या माहेरी शहाड येथे आली. त्यानंतर पती समाधाने दक्षता परत घरी येण्यासाठी अनेक प्रयत्न केले.
कल्याण / सुनील जाधव (प्रतिनिधी) : पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून माहेरी गेलेल्या पत्नीवर हल्ला (Attack) करत तिला गंभीर जखमी (Injury) केल्याची घटना कल्याण जवळच्या शहाडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दारुड्या पतीला अटक (Arrest) केली आहे. समाधान सिताराम पाटील असे अटक करण्यात आलेल्या 35 वर्षीय पतीचे नाव आहे. पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करायचा
समाधान पाटील हा मूळचा धुळे जिल्ह्यातील बोधगावचा रहिवासी आहे. त्याचं लग्न दक्षता सोबत झालं होतं. समाधानला दारूचे व्यसन आहे. तो नेहमी दारूच्या नशेत घरी येऊन पत्नी दक्षता हिला मारहाण करत होता.
पतीच्या त्रासाला कंटाळून माहेरी गेली महिला
पतीच्या मारहाणीला कंटाळून अखेर पतीला सोडून दक्षता तिच्या माहेरी शहाड येथे आली. त्यानंतर पती समाधाने दक्षता परत घरी येण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र त्रस्त झालेल्या दक्षताने परत न येण्याचा निर्णय घेतल्याने समाधान संतप्त झाला होता.
पत्नी परत येत नसल्याच्या रागातून हल्ला
संतापाच्या भरात सोमवारी रात्री आठ वाजता पती समाधान पत्नीला घरी नेण्यासाठी तिच्या घरी आला. शेटचे आपल्या सोबत येण्याचे सांगितले. मात्र त्यावेळी तिने आपण येणार नाही असे सांगितले. याचा राग आल्याने त्याने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
‘तू माझ्या सोबत आली नाहीस तर, मी तुला जिवंत सोडणार नाही’, असे बोलून तिच्यावर हल्ला केला. पत्नीने पतीला प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्ल्यात जखमी झाल्याने ती बेशुध्द होऊन खाली पडली.
यानंतरही आरोपी थांबला नाही. त्याने पत्नीच्या अंगावर व डोळ्यात मिरची पूड टाकून पळ काढला. यात पत्नी गंभीर जखमी झाली. याबाबत खडकपाडा पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी नशेबाज पतीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.