Crime News | नवरा UAE मध्ये नोकरीला, महिलेने घरात काम करणाऱ्या नोकराच गुप्तांग कापलं

Crime News | किचन बंद करायचय सांगून कशीबशी महिला तिथून निसटली. पोलीस घरी आले, त्यावेळी त्यांना रक्ताने माखलेली बेडशीट मिळाली. तिने नोकरावर आरोप केलाय. कोणी नाही, ही संधी साधून नोकराने बलात्काराचा प्रयत्न केला, असा महिलेचा आरोप आहे.

Crime News | नवरा UAE मध्ये नोकरीला, महिलेने घरात काम करणाऱ्या नोकराच गुप्तांग कापलं
woman chops off neighbours genitalsImage Credit source: Representative image
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 3:42 PM

लखनऊ : बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नोकराला एका महिलेने चांगलीच अद्दल घडवली आहे. महिलेने चाकूने या नोकराच गुप्तांग कापून टाकलं व कापलेला भाग घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिथे तिने काय प्रकार घडला. त्या बद्दल सांगितलं. या महिलेचा पती सौदी अरेबियात ड्रायव्हरच काम करतो. उत्तर प्रदेशच्या कौशंबाी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बुधवारी घरात कोणी नाही ही संधी साधून या नोकराने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. किचन बंद करायचय सांगून कशीबशी महिला तिथून निसटली. येताना ती सोबत चाकू घेऊन आली. लैंगिक हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या नोकराच तिने गुप्तांगच कापून टाकलं.

त्यानंतर महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली व तिने काय घडलं ते सांगितलं. पोलीस घरी आले, त्यावेळी त्यांना रक्ताने माखलेली बेडशीट मिळाली. त्यांनी वापरलेला चाकू जप्त केला. आरोपीची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल केलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांना दिलेल्या जबानीत या माणसाने वेगळी बाजू सांगितली. लहानपणापासून मी महिलेच्या घरात काम करतोय. घटनेच्या दिवशी महिलेने मला बोलावलं. मला बेशुद्धा केलं व माझ गुप्तांग कापलं, असं त्या मुलाने सांगितलं.

कोणाविरोधात गुन्हा नोंदवलाय?

मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कलम 326 आणि 308 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिला नंतर ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांना आधी या मुलाला जिल्हा रुग्णालयात हलवलं, तिथून प्रयागराज येथे उपचारासाठी दाखल केलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.