Buldhana Crime : पतीनेच महिला पोलीस कर्मचारीसह मुलीला संपवले, धक्कादायक घटनेने बुलढाणा हादरले !

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलीस त्याच्या कुटुंबाच्या शोधात त्याच्या घरी पोहचले. घरी पोहचताच जे दृश्य दिसले ते पाहून पोलीस हैराण झाले.

Buldhana Crime : पतीनेच महिला पोलीस कर्मचारीसह मुलीला संपवले, धक्कादायक घटनेने बुलढाणा हादरले !
बुलढाण्यात पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीने जीवन संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 5:10 PM

बुलढाणा / 21 ऑगस्ट 2023 : बुलढाण्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात कारणातून एका व्यक्तीने आपल्या पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीसह चार वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना चिखली येथे घडली. यानंतर पतीनेही स्वतःचे जीवन संपवले. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. किशोर कुटे आणि वर्षा कुटे अशी मयत जोडप्याची नावे आहेत. याप्रकरणी चिखली पोलिसात नोंद करण्यात आली असून, पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतरच हत्या आणि आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

चिखली ते खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी महादेव मंदिराजवळ कुटे कुटुंबीय भाड्याच्या घरात राहत होते. किशोर कुटे शेती करायचा. पत्नी वर्षा ही पोलीस दलात कार्यरत असून, चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत होती. या जोडप्याला दोन मुली आहेत. पतीने पत्नी आणि छोट्या मुलीची आधी हत्या केली. त्यानंतर पती घरापासून 25 ते 30 किमी अंतरावर पतीने जीवन संपवले.

‘अशी’ उघडकीस आली घटना?

पतीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. जेव्हा पोलीस त्याच्या घरी पोहचले तेव्हा घरात पत्नी आणि मुलीचा मतदेह आढळल्यानंतर सर्व घटना उघडकीस आली. मोठी शाळेत गेली होती, यामुळे ती वाचली आहे. यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पती-पत्नीमध्ये नेमकं काय घडलं याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतरच हत्या आणि आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.