विम्याची रक्कम हडपण्यासाठी गरोदर पत्नीला नदीत बुडवले, पतीला न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

राजस्थान सीमेवरील चवली नदीत एक कार पडल्याची माहिती सोयत पोलिसांना मिळाली होती. या कारमध्ये एक महिला होती, ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती.

विम्याची रक्कम हडपण्यासाठी गरोदर पत्नीला नदीत बुडवले, पतीला न्यायालयाने दिली 'ही' शिक्षा
कामाचा पगार मागणाऱ्या अल्पवयीन मुलीची हत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 5:25 PM

आगर मालवा : विम्याची रक्कम हडपण्यासाठी पतीनेच गर्भवती पत्नीची हत्या केल्याची घटना आगर मालवा जिल्ह्यात घडली. या हत्याकांड प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने पती संतोष पुरी आणि सासरा ओमप्रकाश पुरी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच 10 हजार रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. पती संतोषने कट रचून गरोदर पत्नीला कारसह चवली नदीत बुडवून ठार मारले. रिंकू पुरी असे मयत महिलेचे नाव आहे.

नदीत कार पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली

राजस्थान सीमेवरील चवली नदीत एक कार पडल्याची माहिती सोयत पोलिसांना मिळाली होती. या कारमध्ये एक महिला होती, ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. रायपूर पोलिसांनी सर्च ऑपरेशन रावबत महिलेचा मृतदेह नदीतून बाहेर काढला.

महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला

मृतदेह हाती लागल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना महिलेची ओळख पटली. रिंकू पुरी असे महिलेचे नाव असून घटनेच्या दीड वर्षापूर्वी तिचा विवाह संतोष पुरीसोबत झाला होता. मृत्यूसमयी ती सात महिन्यांची गर्भवती होती.

हे सुद्धा वाचा

पती-पत्नी देव दर्शनासाठी गेले होते

घटनेच्या दिवशी रिंकू आणि संतोष पुष्करजीतला दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन पती-पत्नी आगरला घरी परतत असताना मध्य प्रदेशातील चवली नदीच्या पुलावरून त्यांची कार सायंकाळच्या सुमारास नदीत पडली. यात गर्भवती पत्नीचा बुडून मृत्यू झाला.

तपासादरम्यान पोलिसांना विम्याची माहिती मिळाली

मात्र प्रकरणाचा बारकाईने तपास करताना पोलिसांना कळले की, संतोषने काही दिवसांपूर्वीच पत्नीचा विमा काढला होता. त्याची विम्याच्या रकमेवर नजर होती. त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला

पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी, मयत रिंकूची बहिण आणि तिचा मित्र यांचे जबाब आणि व्हॉट्सअप चॅटिंगच्या आधारे पोलिसांना संशय खरा ठरला. त्यानंतर पोलिसांनी मयत रिंकूची एलआयसी विमा पॉलिसी तपासून आरोपीविरुद्ध कलम 302 नुसार गुन्हा नोंदवला. त्यानुसार तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

न्यायालयाकडून आरोपीला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड

न्यायालयाने वकिलांच्या युक्तीवादाशी सहमती दर्शवत आरोपीला कलम 302 अन्वये जन्मठेप आणि 4 हजार रुपये दंड ठोठावला. डिफॉल्टमध्ये 1 महिन्याची शिक्षा सुनावली. तसेच कलम 495 अन्वये 5 वर्षे कारावास आणि 3 हजार रुपये दंड, डिफॉल्टमध्ये 1 महिना कारावास आणि कलम 316 अंतर्गत 5 वर्षे कारावास आणि 3000 रुपये दंड ठोठावला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.