भयंकर! एका रात्रीत दोन वेळा काय करण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या?

पतीने झोपेतून पत्नीला उठवलं आणि मग जी मागणी केली, त्यावरुन घडली धक्कादायक घटना

भयंकर! एका रात्रीत दोन वेळा काय करण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या?
धक्कादायक हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 12:03 PM

उत्तर प्रदेश : अमरोहा जिल्ह्यात एका पतीने पत्नीची हत्या केली. एकाच रात्री दोन वेळा शरीर संबंध ठेवण्यास पत्नीने नकार दिल्याने पतीने तिची गळा आवळून हत्या केली. ही धक्कादायक घडना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजलीय. ‘मला आणखी सेक्स करायचा नाही’, असं पत्नीने पतीला म्हटलं होतं. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. आरोपी पतीने पत्नीला झोपेतून उठवलं होतं आणि सेक्सची इच्छा व्यक्त केली होती. पहिल्यांदा संबंध ठेवून झाल्यानंतर पत्नी झोपी गेली. त्यानंतर पती पुन्हा जागा झाला आणि त्याने पत्नीलाही झोपेतून जागं केलं. यानंतर त्याने केलेल्या मागणीवर पत्नी संतापली होती. यातून त्यांच्यात जोरदार भांडण झालं होतं.

पत्नीने पतीसोबत संबंध ठेवण्यास नकार दिला होता. पत्नीचा नकार पचवणं पतीला जड केलं. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. भांडणादरम्यान तो एक दोरखंड घेऊन आला. याच दोरखंडाने त्याने पत्नीचा गळा आवळला आणि तिचा जीव घेतला.

यानंतर पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही त्याने विचार केला होता. त्याच दरम्यान, त्याने एका पॉलिथीनच्या मोठ्या गोणीत पत्नीचा मृतदेह भरला आणि 50 किलोमीटर दूर फेकला. आपण केलेलं हत्याकांड उघड होऊ नये म्हणून पती स्वतःच पत्नीची बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात गेला होता.

रुखसान नावाच्या महिलेसोबत अनवर याचं 2013 साली लग्न झालं होतं. रुखसार आणि अनवर यांना 3 मुलं आहेत. अनवर आपल्या घराच्या तळमजल्यावर एक बेकरीचं दुकान चालवतो. तर कुटुंब पहिल्या मजल्यावर राहत होते.

5 डिसेंबर रोजी पती-पत्नीमध्ये सेक्सवरुन खटका उडाला होता. त्यातून अनवर याने रुखसान हिची हत्या केली. मुरादाबाद पोलिसांना गेल्या मंगळवारी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर मुरादाबाद पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत होती. त्या दरम्यान, सापडलेला मृतदेह रुखसानचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांना अनवर याच्यावर संशय बळावला.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान अनवर याने आपणच ही हत्या केल्याची कबुली दिली. अनवर रुखसान हिची हत्या करण्याच्या इराद्यात होता. सोमवारी सकाळी जेव्हा रुखसाना हीने अनवर याला संबंध ठेवण्यास नकार दिला, तेव्हा त्याने तिचा खून केला, अशी माहिती पोलीस तपासातून उघड झाली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.