तो 71 वर्षांचा वृद्ध, ती 35 वर्षांची तरुणी; आधी प्रेमात पडले, लग्न केले, मग जे घडले ते…

35 वर्षाच्या तरुणीने 71 वर्षाच्या वृद्धाशी लग्न केले. पण लग्नानंतर काही दिवसातच दोघांमध्ये मतभेद होऊ लागले. भांडणं होऊ लगाली. यामुळे तरुणीने वृद्ध पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

तो 71 वर्षांचा वृद्ध, ती 35 वर्षांची तरुणी; आधी प्रेमात पडले, लग्न केले, मग जे घडले ते...
घटस्फोट मागणाऱ्या पत्नीला पतीने संपवलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 10:43 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या राजौरी गार्डन परिसरात हत्याकांड झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका फ्लॅटमध्ये 35 वर्षीय महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. पूजा असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेचे 71 वर्षीय वृद्धासोबत लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर त्यांच्यात मतभेद होऊ लागल्याने तिने घटस्फोटाची मागणी केली होती. तसेच बदल्यात 1 कोटी रुपयांची पोटगीही मागितली होती. पैशाची मागणीच महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे. हत्येची घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

पत्नी 1 कोटीची मागणी करत होती

पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहेत. मृत महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी चाकूने वार केल्याच्या खुणा आढळल्या. महिलेचे सहा महिन्यांपूर्वीच 71 वर्षीय एस.के. गुप्ता नावाच्या वृद्ध व्यक्तीशी लग्न झाले होते. गुप्ता चार्टर्ड अकाउंटंट असून त्याला 45 वर्षांचा दिव्यांग मुलगा आहे. याच दिव्यांग मुलाची काळजी घेण्यासाठी त्याने या वयात पूजासोबत दुसरे लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले आणि कालांतराने कडाक्याचे भांडण होऊ लागले. याचदरम्यान महिलेने घटस्फोटाच्या बदल्यात एक कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र गुप्ता हे पैसे देण्यास तयार नव्हता.

महिलेच्या हत्येसाठी 10 लाखाची सुपारी

पत्नीने 1 कोटी रुपयांसाठी तगादा लावल्यानंतर गुप्ताने अपंग मुलाला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या विपिन सेठीला ही बाब सांगितली. यानंतर सेठीने 10 लाख रुपये दिल्यास पत्नीचा कायमचा काटा काढण्याची तयारी दाखवली. त्यापैकी दोन लाख 40 हजार रुपये विपीनला अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते. त्यानुसार संधी मिळताच विपिन आणि त्याचा साथीदार हिमांशू या दोघांनी पूजावर चाकूने वार करून तिची हत्या केली. मात्र महिलेचा मृत्यू दरोडेखोरांच्या हल्ल्यात झाल्याचा बनाव केला. त्यासाठी घरातील सामानाची तोडफोड करण्यात आली आणि मुलगा अमितचा फोनही हिसकावून घेतला होता.

हे सुद्धा वाचा

हत्येप्रकरणी वृद्ध पतीसह चौघांना अटक

पोलिसांनी घटनास्थळाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. प्राथमिक तपासातच पोलिसांना या घटनेमागे दरोड्याचा हेतू दिसला नाही. अशा स्थितीत पोलिसांनी एस.के.गुप्ताची सखोल चौकशी केली. पोलिसांनी त्याला खाकी वर्दीचा दणका देताच संपूर्ण कटाचा उलगडा झाला. आरोपी गुप्तासह विपिन सेठी आणि अमितने गुन्ह्यातील आपल्या सहभागाची कबूली दिली. पोलिसांनी हत्येमध्ये वापरण्यात आलेला फोन, रक्ताने माखलेले कपडे आणि गुन्ह्यात वापरलेली स्कूटी जप्त केली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.