घरात एकाच खाटेवर रात्री सोबत झोपले, पहाटे उठल्यानंतर पती रक्ताच्या थारोळ्यात, मध्यरात्री काय घडलं? पत्नीला थांगपत्ताच नाही

मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात प्रचंड विचित्र आणि भयानक घटना समोर आली आहे (Husband murdered in night while wife sleeping near him at MP Vidisha).

घरात एकाच खाटेवर रात्री सोबत झोपले, पहाटे उठल्यानंतर पती रक्ताच्या थारोळ्यात, मध्यरात्री काय घडलं? पत्नीला थांगपत्ताच नाही
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 7:29 PM

भोपाळ : मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात प्रचंड विचित्र आणि भयानक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याचं नुकतंच काही दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. घरातील सर्व मंडळी काही कारणास्तव बाहेर गावी गेले होते. रात्रीच्या वेळी पती-पत्नी एकाच खाटेवर घरात झोपले होते. मात्र, पहाटे उठवल्यानंतर धक्कादायक घटना समोर आली. खाटेवर झोपलेल्या पती-पत्नीपैकी पतीची निघृणपणे हत्या झाली होती. विशेष म्हणजे पतीच्या अगदी शेजारी झोपूनही पत्नीला या घटनेची थोडीही चाहूल लागली नाही म्हणून परिसरात आश्चर्य व्यक्त केला जातोय. घरात रात्री पती-पत्नी झोपलेले असताना बाहेरुन आलेल्या एका अज्ञाताने पतीची गळा चिरुन हत्या केली. यावेळी पत्नीला या घटनेची थोडीही चुणूक लागली नाही (Husband murdered in night while wife sleeping near him at MP Vidisha).

घरात पती-पत्नी एकटे असतानाच घटना

संबंधित घटना ही विदिशा येथून 70 किमी लांब मलिया खेडी गावात घडलीय. या गावातील एका दाम्पत्याचं अवघ्या 15 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. दाम्पत्याचं 20 जूनला लग्न झालं होतं. त्यानंतर नववधू सासरी आली होती. नववधू घरी आल्यानंतर घरातील सर्व मंडळी नर्मदा नदित स्नान करण्यासाठी होशंगाबाद येथे गेले. या दरम्यान घरात पती-पत्नी एकटेच होते. पण मध्यरात्री कुणी अज्ञाताने घरात घुसून पतीची हत्या केली (Husband murdered in night while wife sleeping near him at MP Vidisha).

नेमकं काय घडलं?

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघं पती-पत्नी एकाच खाटेवर झोपले होते. घराचे दरवाजे बंद होते. मात्र, कुणीतरी मध्यरात्री घरात शिरलं. त्याने खाटेवर झोपलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. विशेष म्हणजे यावेळी मृतकाची पत्नी बाजूलाच झोपली होती. पण तिला या घटनेची जराही चाहूल लागली नाही. शेजारी झोपलेला पतीचा खून झाला पण त्याचा मागमूसही पत्नीला झाला नाही, या घटनेवर परिसरातील कुणाचाही विश्वास बसत नाहीय.

पोलिसांना पत्नीवर संशय

या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून मृतकाच्या पत्नीची कसून चौकशी सुरु आहे. मृतकाच्या पत्नीने आपल्याला या घटनेविषयी काहीच माहिती नसल्याचं पोलिसांना सांगितलं. “मला झोपेतून सकाळी उठल्यानंतर शेजारी झोपलेले पती रक्तबंबाळ अवस्थेत दिसले. ते बघून छातीत धडकी भरली. नंतर पतीचा हात बाजूला सारला तर त्यांची हत्या झाल्याचं लक्षात आलं. मी तातडीने शेजारच्यांना बोलावलं. नेमकं काय घडलंय ते मला काहीच माहिती नाही. कारण मी झोपलेले होती”, असं म्हणत मृतकाच्या पत्नीने पोलिसांसमोर टाहू फोडला. दुसरीकडे मृतकाच्या भावाने आमचं कुणासोबतही शत्रूत्व नव्हतं असं सांगितलं. त्यामुळे या हत्येमागील गूढ आणखी वाढलं आहे. आता पोलीस या हत्येचा उलगडा नेमका कसा करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

‘मी माझ्या मर्जीने इस्लाम स्वीकारला, माझ्या कुटुंबियांपासून जीवाला धोका’, नांदेडच्या ‘त्या’ तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

आधी मुलगी पळून गेली, नंतर मुलीच्या बापाला मारहाण, हाणेगावात काय घडलं?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.