Video : अर्धांगिनी नव्हे आफत! मुख्याध्यापक नवऱ्याला चक्क बॅट आणि तव्यानं बायकोची मारहाण

मुख्याध्यापक असलेल्या अजित यादव यांचं नऊ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. सुमन नावाच्या तरुणीशी त्यांनी प्रेमविवाह केलेला.

Video : अर्धांगिनी नव्हे आफत! मुख्याध्यापक नवऱ्याला चक्क बॅट आणि तव्यानं बायकोची मारहाण
बेदम मारहाण सीसीटीव्हीत कैदImage Credit source: Twitter Video Snap
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 12:45 PM

नवरा-बायको (Husband Wife) आणि भांडण, हे समीकरण कुणाला चुकलंय? भांडण तर संसाराचा एक भागच आहेत. बायकोला अर्धांगिनी म्हणतात. अनेक नवरा बायकांमध्ये वाद टोकाला जातात. त्यातून नवरा बायकोला मारहाण (Husband Beaten by Wife) करतो, अशीदेखील घटना समोर येतात. पण आता समोर आलेली घटना याच्या बरोबर विरुद्ध आहे. बायकोनं नवऱ्याला मारहाण केली आहे. मारहाण इतकी जबर होती, की पीडित नवऱ्याला कोर्टात (Couple Dispute) जाण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक उरला नाही. घटना आहे राज्यस्थानमधली. राजस्थानच्या अलवर इथं राहणाऱ्या एका पतीला त्याची पत्नी मारहाण करायची. बॅट, तवा, मिळेल त्यानं पतीला बदडणाऱ्या या पत्नीविरोधात पती अखेर वैतागला आणि त्यानं कोर्टात दाद मागितली. विशेष म्हणजे या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच अधोरेखित झालंय.

काय आहे प्रकरण?

पीडित पतीचं नाव आहे अजित यादव. अजित एका शाळेत मुख्याध्यपक आहे. अलवर्चाय भिवाडी इथं हे दाम्पत्य राहतं. वर्षभरातून अजितची पत्नी त्याला मानसिक त्रास तर देतेच आहे. पण शारीरीक छळही करतेय. अखेर वैतागलेल्या पतीनं पत्नीकडून सुरु असलेला छळ सगळ्यांना कळावा, यासाठी एक शक्कल लढवली.

मुख्याध्यापक पतीनं आपल्या पत्नीविरोधात सबळ पुरावा सादर करण्यासाठी मारहाणीची घटना रेकॉर्ड करण्याचं ठरवलं. त्यासाठी पतीनं चक्क सीसीटीव्ही कॅमेरा घरात बसवले. त्यानंतर जेव्हा पत्नीनं पतीला मारहाण केली, ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडीओ घेत अखेर पीडित पतीनं कोर्टात दाद माहितली आहे.

व्हिडीओमध्ये काय?

व्हिडीओमध्ये पत्नी मुख्यध्यापक पतीला तवा आणि बॅटने मारहाण करत असल्याचं दिसतंय. मुलासमोरच ही पत्नी आपल्या पतीला बेदम मारहाण करत असल्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय.

प्रेमविवाह आणि मग पंगा..

मुख्याध्यापक असलेल्या अजित यादव यांचं नऊ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. सुमन नावाच्या तरुणीशी त्यांनी प्रेमविवाह केलेला. त्यानंतर दोघांना आठ वर्षांचा एक मुलगा देखील आहे. लग्नानंतर नव्याची नवलाई संपली आणि सुमनने अजित यांचा जाच करण्यास सुरुवात केली. अखेर वैतागलेल्या अजित यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून पत्नी छळ करतेय, असा आरोप अजित यांनी केलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.