पत्नीची हत्या करुन पतीने मृतदेह जंगलात जाळला, Delta Plus संसर्गाने मृत्यू झाल्याचा बनाव

श्रीकांतने सर्वांना फोन करुन सांगितलं की पत्नीला कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली होती, मात्र हैदराबादमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नातेवाईकांचा श्रीकांतच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही.

पत्नीची हत्या करुन पतीने मृतदेह जंगलात जाळला, Delta Plus संसर्गाने मृत्यू झाल्याचा बनाव
आरोपी पती श्रीकांत रेड्डी
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 12:10 PM

हैदराबाद : बायकोची हत्या केल्यानंतर पतीने तिचा मृतदेह सूटकेसमध्ये टाकून जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची (Delta Plus variant) लागण झाल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव त्याने नातेवाईकांसमोर रचला. मात्र सीसीटीव्हीमुळे पतीचं पितळ उघडं पडलं. आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. (Hyderabad man kills techie wife sets dead body on fire tells family she died of Delta Plus variant)

आरोपी पती श्रीकांत रेड्डी हा आंध्र प्रदेशातील कडपा जिल्ह्यातील बुद्वेलचा रहिवासी आहे. चित्तूर जिल्ह्यातील रामसमुद्रममध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय भुवनेश्वरीसोबत 2019 मध्ये त्याचा प्रेम विवाह झाला होता. दोन-तीन महिन्यांपूर्वीच रेड्डी दाम्पत्य तिरुपतीमधी डीबीआर रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते. त्यांना दीड वर्षांची मुलगीही आहे.

नोकरी गेल्यानंतर दाम्पत्यात वाद

भुवनेश्वरी ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. हैदराबादमधील एका आयटी कंपनीत ती नोकरी करत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती सध्या घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करत होती. मात्र 2020 मध्ये श्रीकांतची नोकरी गेली. त्यानंतरच दोघांमध्ये वाद वाढले होते. वादावादीतून श्रीकांतने पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर त्याने भुवनेश्वरीचा मृतदेह एका बॅगेतून जंगलात नेला आणि निर्जन जागा पाहून जाळून टाकला.

जंगलात मृतदेह जळालेल्या अवस्थेत

23 जूनला पोलिसांना भुवनेश्वरीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले. त्यात दिसलेल्या टॅक्सी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी केली.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसलं

त्याच वेळी, श्रीकांतच्या अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये 22 जूनला तो आपल्या मुलीला कडेवर घेऊन बाहेर जाताना दिसला. त्यावेळी लाल रंगाची सूटकेस तो घरातून ओढत बाहेर पडताना दिसत होतं. ही सूटकेस घेऊन तो टॅक्सीमध्ये बसला. टॅक्सी तिरुपतीमधील रुया सरकारी हॉस्पिटलजवळी निर्जन जागेवर त्याने थांबवली. त्यानंतर सूटकेसमधून मृतदेह बाहेर काढत पेट्रोल टाकून त्याने जाळला. लाल सूटकेस घरी परत आणताना वजनाने हलकी असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये जाणवत होतं.

कोरोनाने मृत्यूचा बनाव

घरी आल्यावर पत्नी भुवनेश्वरीच्या फोनवर तिच्या माहेरहून फोन आले होते. त्यामुळे श्रीकांतने सर्वांना फोन करुन सांगितलं की तिला कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली होती, मात्र हैदराबादमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नातेवाईकांचा श्रीकांतच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. भुवनेश्वरीची भाची ममता ही कर्नूल जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तिने श्रीकांतच्या अपार्टमेंटचे सीसीटीव्ही फूटेज तपासले, तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. परंतु या घटनेनंतर आरोपी श्रीकांत परागंदा झाला आहे.

संबंधित बातम्या :

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडून पोटच्या मुलीची पाण्याच्या हौदात बुडवून हत्या

इंटरनेटवर हत्या करण्याची पद्धत सर्च, दुसऱ्या पत्नीला जीवे मारलं, विरारमध्ये तरुणाला अटक

(Hyderabad man kills techie wife sets dead body on fire tells family she died of Delta Plus variant)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.