पत्नीने शारीरिक सुखाला नकार दिला, मग पतीला संताप अनावर झाला अन्…

दोन वर्षापूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता. एक मुलगाही झाला. दोघांचा संसार सुखात चालला होता. एका क्षुल्लक कारणातून पतीला संताप अनावर झाला आणि नको ते करुन बसला.

पत्नीने शारीरिक सुखाला नकार दिला, मग पतीला संताप अनावर झाला अन्...
शरीरसुखाला नकार देणाऱ्या पत्नीला पतीने संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 2:18 PM

हैदराबाद : पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिची थेट हत्या केल्याची खळबळजनक घटना हैदराबादमध्ये घडली. घटनेच्या दहा दिवसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. जाटवथ तरुण असे आरोपी तरुणाचे नाव असून, पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. जोडप्याचा 2021 मध्ये प्रेमविवाह झाला होता. दोघांना एक मुलगा देखील आहे. आरोपी पेशाने रिक्षाचालक आहे. आईच्या मृत्यूमुळे चिमुकला मुलगा आईच्या मायेला पारखा झाला आहे.

शरीरसंबंध ठेवायला नकार दिल्याने पतीने संपवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पतीने पत्नीकडे शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र दिवसभर खूप थकल्यामुळे पत्नीने त्याला नकार दिला. मात्र, पतीने तिच्यावर जबरदस्ती सुरू केली. ती ओरडू लागली तेव्हा त्याने हाताने तिचे तोंड दाबले. काही वेळ हाताने तोंड आणि नाक दाबून ठेवले. त्यामुळे झाशीला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला. यादरम्यान ती बेशुद्ध होऊन तिच्या तोंडाला फेस येऊ लागल्याने पती घाबरला आणि त्याने घरच्यांना याबाबत माहिती दिली. घरच्यांनी ओवेसी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शवविच्छेदन अहवालात गुन्हा उघड

रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी सदर रुग्णालयात धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी सरकारी उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवला. पत्नीच्या मृत्यूचे कारण विचारल्यानंतर पती काहीच सांगत नव्हता. अखेर महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सैदाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन अहवालामध्ये महिलेचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.