प्रसिद्ध पार्श्वगायिकेच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, ‘गायिका’ मावशी-‘संगीतकार’ काका अटकेत

संबंधित पार्श्वगायिका चेन्नईत सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने आपल्या अल्पवयीन मुलीला मावशीच्या घरी ठेवलं (Playback singer accused sister of sexually harassing daughter)

प्रसिद्ध पार्श्वगायिकेच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, 'गायिका' मावशी-'संगीतकार' काका अटकेत
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 10:32 AM

हैदाराबाद : प्रसिद्ध पार्श्वगायिकेच्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना हैदाराबादमध्ये उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी पीडितेच्या सख्ख्या मावशीसह चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. पार्श्वगायिकेने जिच्याविरोधात तक्रार केली ती सख्खी बहीणही गायिका आहे, तर बहिणीचा पती संगीतकार आहे. याशिवाय त्यांच्या नातेवाईकाचा मुलगा आणि चर्चच्या पाद्रीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. (Hyderabad Playback singer accused own sister of sexually harassing her daughter)

संबंधित पार्श्वगायिका चेन्नईत सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने आपल्या अल्पवयीन मुलीला मावशीच्या घरी ठेवलं. या काळात मावशी, तिचा पती, त्यांच्या नातेवाईकाचा मुलगा यांनी तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार मावशीने तिला चेन्नईतील किलपौक भागात असलेल्या चर्चमध्ये नेलं. तिथे हेन्री पॉल या पाद्रीने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे.

पीडितेने घडला प्रकार आईला सांगितला

या प्रकाराची माहिती पीडित मुलीने फोन करुन आपल्या आईला दिली. धक्का बसलेल्या पार्श्वगायिकेने ताबडतोब चेन्नई गाठलं. त्यानंतर किलपौकमधील महिला पोलिस स्थानकात तिने चौघा आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पीडिता अल्पवयीन असल्यामुळे पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मावशीही ऑपेरा सिंगर

आरोपी मावशीही ऑपेरा सिंगर असल्याची माहिती समोर आली आहे. तर तिचा पती संगीत दिग्दर्शक आहे. जीवघेण्या आजारातून बचावल्यानंतर तिने ख्रिस्ती धर्मात परिवर्तन केलं. त्यानंतर तीही महिला पाद्री म्हणून चर्चमध्ये कार्यरत झाली. गायनाच्या माध्यमातून ती धर्मप्रचार करत असल्याची माहिती आहे.

आईच्या संमतीने अल्पवयीन तरुणीवर गँगरेप

15 वर्षांच्या पोटच्या मुलीवर आईनेच सामूहिक बलात्कार घडवून आणल्याची संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. कर्नाटकातील चिक्कमंगळुरुमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे समाजमन सुन्न झालं. जवळपास 30 जणांनी पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीची मावशीच या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं आधी समोर आलं होतं, परंतु आरोपी महिला पीडितेची सख्खी आई असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली.

संबंधित बातम्या :

मुलगी अल्पवयीन, 17 जणांचा बलात्कार, एका फोटोपासून अत्याचार सुरु

सख्ख्या आईच्या संमतीने 15 वर्षांच्या मुलीवर गँगरेप, 32 जणांना अटक

(Hyderabad Playback singer accused own sister of sexually harassing her daughter)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....