घरी सुरू होती लग्नाची चर्चा, पण आता सगळंच संपलं ! भारतीय तरूणीची लंडनमध्ये निर्घृण हत्या

मूळची हैदराबादमधील असणाऱी तरूणी उच्च शिक्षण व नोकरीसाठी लंडन येथे रहात होती. तिच्याच फ्लॅटमेटने तिच्यावर निर्घृण हल्ला केला.

घरी सुरू होती लग्नाची चर्चा, पण आता सगळंच संपलं ! भारतीय तरूणीची लंडनमध्ये निर्घृण हत्या
कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेला संपवले
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 1:31 PM

लंडन : एका भारतीय तरूणीची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना लंडनमध्ये (murder in london)  घडली आहे. ही घटना वेंबलीमधील नील्ड क्रिसेंट या निवासी भागात घडली. अधिकृतरित्या तिचे नाव जाहीर करण्यात आले नसले तरी मिळालेल्या माहितीनुसार तेजस्वीनी कोंथम (वय २७) असे मृत तरूणीचे नाव असून हैदराबाद (hyderabad)  येथील असल्याचे समजते. या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी ही हत्या झाली. मृत तरूणीच्या घरच्यांना याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वीनी ही मूळची हैदराबाद येथील असून ती तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदा लंडनला तिच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी गेली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ती महिनाभरासाठी घरी आली होती. तिच्या लग्नाबाबत घरात बोलणी सुरू होती आणि त्याचसाठी ती गेल्या महिन्यात घरी परत येणार होती अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली.

मंगळवारी सकाळी 10 वाजता झालेल्या या क्रूर हल्ल्यात तेजस्विनिसोबत तिची फ्लॅटमेट असणाऱ्या दुसऱ्या महिलेवरही हल्ला करण्यात आला होता. तिच्यावरही चाकूने वार करण्यात आले असून तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी या गुन्ह्यासंदर्भात संबंधात दोन पुरुषांना अटक केली आहे, त्यापैकी एक 23 वर्षीय ब्राझिलियन नागरिक आहे ज्याचे नाव केव्हन अँटोनियो लॉरेन्को डी मोराइस आहे; त्याला हॅरो येथून अटक करण्यात आली होती. तसेच याप्रकरणातील दुसऱ्या संशयितालाही अटक करण्यात आली असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

‘ आम्ही तिच्या लग्नाचा विचार करत होतो. त्याबाबत पुढील बोलणी झाल्यावर ती परत येणार होती. तिकडे (लंडनमध्ये) तिने तिच्या टेम्पररी जॉबचाही राजीनामा दिला होता. महिन्याभरात काम संपवून ती परत येणार होती,’ असे तिच्या वडिलांनी सांगितले. तेजस्वीनीचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सरकारने आवश्यक ती व्यवस्था करावी अशी विनंती कुटुंबियांनी सरकारला केली आहे.

फ्लॅटमध्येच रहात होता आरोपी

हैदराबादमधील तेजस्वीनीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वीनीचा एक भाऊ लंडनमध्येच रहात असून त्याचे ऑफीस तिच्या घराजवळच रहात होता. तो तिला भेटायला गेला होता. या हल्ल्याप्रकरणी ज्या ब्राझिलियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे , तो तेजस्वीनी व तिची मैत्रिणी यांच्यासह फ्लॅट शेअर करत होता. त्याच फ्लॅटमधील एका दुसऱ्या खोलीत तो वास्तव्यास होता असे समजते. मात्र त्याने नेमका हा हल्ला का केला, त्यामागचे कारण काय, याचा अद्याप तपास सुरू आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.