मला काहीच माहीत नाही, सचिन वाझेंची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचे आरोपही फेटाळले

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाबाबत मला काहीच माहीत नाही. आता खबर मिळाल्यानंतर मी तिकडेच जायला निघालो आहे, असा दावा एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी केला आहे. (i don't know what happened, sachin vaze clarification on mansukh hiren death)

मला काहीच माहीत नाही, सचिन वाझेंची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचे आरोपही फेटाळले
sachin vaze -mansukh
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 6:04 PM

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाबाबत मला काहीच माहीत नाही. आता खबर मिळाल्यानंतर मी तिकडेच जायला निघालो आहे, असा दावा एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी केला आहे. यावेळी वाझे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळून लावले. (i don’t know what happened, sachin vaze clarification on mansukh hiren death)

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीमालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे हे प्रत्येक यांच्यावर या प्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यावर सचिन वाझे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मनसुख हिरेनचं काय झालं मला काहीच माहीत नाही. मला आताच कळलंय. मी ठाण्यालाच चाललो आहे, असं वाझे म्हणाले.

हिरेन यांनीच तक्रार केली होती

यावेळी त्यांनी हिरेन यांनी तीन दिवसांपूर्वी तक्रार केली होती. त्यात पोलीस आणि पत्रकार त्रास देत असल्याचं म्हटलं आहे. पोलीस आणि पत्रकार वारंवार फोन करत आहेत. एका पत्रकाराने रात्री उशिरा फोन करून पोलीस तुम्हे सस्पेक्ट की नजर से देख रही है, असं म्हटलं होतं, असं त्यांनी तक्रारीत म्हटल्याचं वाझे यांनी सांगितलं.

त्यांनाच विचारा

तुमचं आणि हिरेन यांचं पूर्वी बोलणं झालं होतं. त्याचा सीडीआरही उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे, असं विचारताच वाझे यांनी हे आरोप नाकारले. तुम्ही त्यांनाच विचारा. मला याबाबत काहीच माहिती नाही. त्यांना आरोप करू द्या. पण मला काही माहीत नाही, असं त्यांनी त्यांनी स्पष्ट केलं.

मी सर्वात आधी पोहोचलो नव्हतो

वाझे सर्वात प्रथम क्रॉफर्ड मार्केटला गेले कसे? असा सवाल फडणवीस यांनी केला होता. वाझे यांनी हा आरोपही फेटाळून लावला आहे. माझ्या आधी तिथे अनेक यंत्रणा गेल्या होत्या. सीनियर पीआय गावदेवी, ट्राफीक एसपी, डीसीपी झोन-2 आणि बीडीडीएस पोहोचले होते. त्यानंतर क्राईम ब्रान्चचं युनिट पोहोचलं होतं. त्यात मी होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (i don’t know what happened, sachin vaze clarification on mansukh hiren death)

संबंधित बातम्या:

Who is Sachin Vaze : अर्णबला घरातून उचलणारे ते आता अंबानी स्फोटकप्रकरणात चर्चेत असलेले इन्काऊंट स्पेशालिस्ट सचिन वाझे कोण?

VIDEO: मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये मनसुख हिरेन यांना कोण भेटलं?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

Mukesh Ambani bomb scare : फडणवीसांच्या 4 प्रश्नांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे आरोपीच्या पिंजऱ्यात

(i don’t know what happened, sachin vaze clarification on mansukh hiren death)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.