मनोरमा खेडकरला पकडायला गेले, ‘इंदूबाई ढाकणे’ सापडली… रात्री 11 वाजता लॉजवर काय घडलं?

बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्या फरार झाल्या. अखेर काल ( गुरूवार) त्यांना रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमधून त्यांना अटक करण्यात आली.

मनोरमा खेडकरला पकडायला गेले, 'इंदूबाई ढाकणे' सापडली... रात्री 11 वाजता लॉजवर काय घडलं?
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 11:22 AM

वाढता वाढता वाढे… वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्या अडचणी तर वाढतच चालल्या आहेत.त्यांच्याविरोधातील प्रकरणं काय कमी होती म्हणून आता त्यांच्या आई-वडिलांचेही कारनामे समोर येत आहेत. बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी त्यांची आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्या फरार झाल्या. अखेर काल ( गुरूवार) त्यांना रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमधून त्यांना अटक करण्यात आली. पोलिस अनेक दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते, मात्र त्यांचा मोबाईल बंद होता, कोणताही संपर्क साधता येत नव्हता. अटक टाळण्यासाठी त्या फरार झाल्या आणि लपून बसल्या.

मात्र पोलिसांनी शोधपथक पाठवत, कसून तपास करत अखेर त्यांना गुरूवारी अटक केली. महाडमधील हिरकणवाडी येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांना कोर्टात हजर केल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मनोरमा खेडकर फरार असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके रवाना झाली होती. ट्रॅप लावत महाडमधील एका लॉजमधून त्यांना ताब्यात घेतलं.

तीच चूक नडली

वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा हा अपघातानंतर फरार झाला होता. त्याला शोधतानाही पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. मात्र त्याच्या मित्राच्या एका चुकीमुळे तो पकडला गेला होता. असंच काहीसं मनोरमा खेडकर यांच्या बाबतीतही घडलं. त्यांच्या एका चुकीमुळे पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा कळलां आणि त्यांनी पटापट सूत्र हलवत मनोरमा यांना अटक केली.

नेमकं काय घडलं ?

बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या. पोलिसांना चकमा देत त्या इकडेतिकडे लपत होत्या. अखेर त्या महाड येथील हिरकरणीवाडीमधील पार्वती निवास हॉटेलमध्ये जाऊन लपल्या, तेथे राहण्यासाठी त्यांनी खोट्या नावाने रूम बुक केली होती. कॅब ड्रायव्हर दादासाहेब ढाकणे यांच्या आधार कार्डचा मनोरमा खेडकर यांनी गैरवापर केला. आणि ड्रायव्हरच्या आईच्या आधार कार्डवरील नावाचा वापर करून त्यांनी इंदूबाई ढाकणे या नावाने हिरकणीवाडीत रूम बुक केली. पोलिस त्यांचा सर्वत्र शोध घेत होते, पण नाव बदलून रहात असल्याने त्यांना शोधणं कठीण गेलं

मात्र मनोरमा यांना त्यांची एक चूक नडली. लॉजमध्ये लपलेल्या असतानाच 17 तारखेला रात्री अकरा वाजताच्या सुमारास मनोरमा खेडकर यांनी त्यांचा फोन सुरू केला होता. मनोरमा यांना शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या फोनवरही नजर ठेवली होती. त्या दिवशी मनोरमा यांनी फोनसुरू केला आणि पोलिसांना त्याचं लोकेशन समजलं. त्यांनी तातडीने सूत्र हलवली आणि घटनास्थळी धाव घेत त्या लॉजवरून पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं, अशी माहिती समोर आली आहे. एका चुकीमुळे त्या पकडल्या गेल्या.

मिहीर शाहच्या केसशी साधर्म्य

वरळी हिट अँड रन केसमधील मुख्य आरोपाी मिहिर शाह याला पोलिसांनी तीन दिवसांनी अटक केली होती. मिहीर शाह त्याच्या कुटुंबियांना घेऊन मित्रासह शहापूरला एका रिसोर्टमध्ये लपला होता. तीन दिवस झाले मात्र फरार आरोपीला शोधण्यासाठी वेळ लागल्याने मुंबई पोलिसांवर टीका होत होती. आरोपीने प्लान करत पळ काढला होता. पण मिहीरच्या मित्राने एक चूक केली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.

आरोपी मिहिर शाहने स्वत: चा आणि मित्राचा मोबाईल बंद ठेवला होता. मिहिर हा त्याचा पालघर आणि बोरिवलीच्या एका मित्राच्या फोनवरून अनेकांशी संवाद साधत असल्याची माहिती सूत्रांनी मिळाली होती. रात्री मिहिर शहा शहापूरच्या रिसॉर्टमधून विरारला आला. या दरम्यान त्याच्या मित्राने एक चूक केली ती म्हणजे सकाळी 15 मिनिटांसाठी मिहिरच्या मित्राने त्याचा बंद ठेवलेला मोबाइल 15 मिनिटांसाठी सुरू केला. हा फोन पोलिसांच्या सर्वेलन्सवर होता, त्याचं लोकेशन पोलिसांना मिळालं.  संशय बळावल्याने वरळी पोलिसांचे बोरिवली येथे असलेले पथक  विरारला पाठवले. पोलिसांनी विरार फाट्यावर मिहीरला अटक केली.

मनोरमा खेडकर यांनीही फोन ऑन करून तीच चूक केली आणि त्या पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या.

पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दिली दुसरी नोटीस

वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्याकडे वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीदेवी पाटील पुन्हा तिसऱ्यांदा दाखल झाल्याने चर्चा सुरू झाली. काल एपीआय पाटील यांनीच पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांची नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र पूजा खेडकर अद्यापही वाशिम येथील विश्रामगृहातच मुक्कामी आहेत. त्यामुळे श्रीदेवी पाटील यांनी खेडकर यांची पुन्हा भेट घेऊन नोटीस दिली.  पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्या संदर्भात पूजा खेडकर यांना उद्या 20 तारखेला पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे.  पूजा खेडकर यांना या आधी नोटीस देऊन काल 18 जुलै रोजी पुणे येथे उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. मात्र त्या उपस्थित न राहिल्यानंतर दुसरी नोटीस देण्यात आली.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.