पोलीसांनी संपूर्ण पीकअप गाडी तपासली, अखेरच्या क्षणी पोलिसांनाच धक्का बसला, ‘पुष्पा’चा कारनामा काय?
महाराष्ट्रात अवैध मद्याची मोठी विक्री होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात असते.
नाशिक : गेल्या काही महिन्यांपूर्वी पुष्पा ( Pushpa ) नावाचा चित्रपट आला होता. त्यातील अल्लू अर्जुन या अभिनेत्याने केलेली भूमिका संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली होती. त्याच पार्श्वभूमीवर अनेक प्रकारची तस्करी करणारे तस्कर पुष्पा सारखं बनायला जात आहे. मात्र, पोलीसांच्या किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पथकात असे पुष्पा हाती लागत आहे. दारूची अवैध ( Illegals Liquor ) वाहतुक करणाऱ्या अशाच एका पुष्पाला कळवण येथे राज्य उत्पादन विभागाच्या एका पथकाने गजाआड केलं आहे. मात्र, यामध्ये अवैध दारू वाहतुक करण्यासाठी वापरलेले शक्कल चर्चेचा विषय ठरत आहे.
नाशिकच्या कळवण येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. अवैध मद्य वाहतुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका संशयित आरोपीने थेट पिकअप वाहनात चोरकप्पा बनवून अवैध मद्य वाहतुक करत असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रात अवैध मद्याची मोठी विक्री होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात असते. संपूर्ण वाहनाची तपासणी करून झाल्यावर पथकाच्या धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.
यामध्ये थेट पीकअप वाहनाच्या पाठीमागील बाजूलाच चोरकप्पा बनविण्यात आला होता. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने पीकअप वाहनाची तपासणी करत असतांना ही बाब उघड झाली आहे.
राज्य उत्पादन विभागाच्या निरीक्षकांना गोपनीय माहितीवरुन पीकअप वाहनात अवैध वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून कळवण हद्दीतील राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली होती.
यामध्ये संशयित पीकअप वाहन असल्याने तपासणी केल्यानंतर आपल्याला चुकीची माहिती मिळल्यची खात्री पटली होती. मात्र, त्यानंतर मात्र पथकातील चालक असलेल्या कर्मचाऱ्यांने गाडीच्या बॉडीचा आकार थोडा मोठा असल्याचा संशय आला.
संपूर्ण पीकअप वाहन तपासले मात्र यामध्ये कुठेही काहीही आढळून आले नाही. मात्र खालील बाजूला असलेल्या बॉडीच्या मधील पत्रा ओढून बघितल्यानंतर मध्ये चोरकप्पा बनविल्याचे समोर आले आणि त्यात विविध प्रकारच्या मद्याचे बॉक्स आढळून आले.
चित्रपटाला लाजवेल अशाच स्वरूपाची अवैध तस्करी समोर आल्याने पथकालाही मोठा धक्काच बसला. जवळपास दहा लाखांच्या किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे.
राज्य उत्पादन शुल्काच्या कारवाई असा मद्य तस्करीचा प्रकार समोर आल्याने पीकअप वाहनांतून तस्करी होत असल्याचे समोर आले असून आता पीकअप वाहने रडारवर आहे. नुकत्याच केलेल्या कारवाईत सुरेश कुमार रामलाल बिश्नोई याला अटक केली आहे.
या कारवाईत विदेशी कंपनीच्या अवैध मद्याचा लाखों रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून असा कुठला संशय आढळून आल्यास टोल फ्री नंबरवर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.