Ahmednagar Crime : उधार पेट्रोल दिले नाही म्हणून कर्मचाऱ्यांना मारहाण, दोन जण गंभीर जखमी

नगरमध्ये गुन्हेगारी कमी होण्याचे नावच घेताना दिसता नाही. गावगुंडांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Ahmednagar Crime : उधार पेट्रोल दिले नाही म्हणून कर्मचाऱ्यांना मारहाण, दोन जण गंभीर जखमी
नगरमध्ये पेट्रोलच्या वादातून कर्मचाऱ्यांना मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 4:13 PM

अहमदनगर / 2 ऑगस्ट 2023 : नगरमध्ये गावगुंडांची दहशत थांबताना दिसत नाही. उधार पैसे दिले नाही म्हणून गावगुंडांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना नगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये घडली आहे. या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस गुंडांचा शोध घेत आहेत.

काय घडलं नेमकं?

राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. या पेट्रोल पंपावर गावगुंडांचे टोळके आले आणि उधारीवर पेट्रोल मागितले. मात्र कर्मचाऱ्यांनी उधार पेट्रोल देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या टोळक्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लाकडी दांड्यासह लोखंडी गजाने बेदम मारहाण केली.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

ही घटना पाहत असेलल्या येथील नागरिकांमध्ये दहशहतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान या प्रकरणी 11 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये या गुंडांच्या टोळक्याकडून सातत्याने सामान्य नागरिकांना ञास देण्याच्या घटना वाढत आहेत. या गुंडांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या घटनेत कॉलेज तरुणावर हल्ला

बसमधील क्षुल्लक वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याची घटना नगर शहरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.