पोलीस नकली, पण रुबाब दमदार, अखेर या छोट्याशा चुकीमुळे सापडला आणि जेरबंद झाला !

अंगात पोलिसाचा युनिफॉर्म, पायात लाल शूज आणि कमरेला शस्त्र होल्स्टर घालून तो ऐटीत चहाच्या टपरीवर चहा पित होता. मात्र इतक्यात खरे पोलीस तेथे आले.

पोलीस नकली, पण रुबाब दमदार, अखेर या छोट्याशा चुकीमुळे सापडला आणि जेरबंद झाला !
तोतया ट्रॅफिक पोलिसाला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 10:48 PM

मुंबई / गोविंद ठाकूर : एका तोतया ट्रॅफिक पोलिसाचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश करुन त्याला अटक केली आहे. पैसे उकळण्यासाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत फिरायचा. मात्र एमआयडीसी पोलिसांच्या वेळीच ही बाब लक्षात आली आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या बाईकमध्ये अनेक नंबर प्लेट्स ठेवल्या होत्या आणि त्याच्या बाईकवर दोन नंबर लावले होते. एका नंबरवर नमस्काराचे स्टिकर चिकटवले होते. मात्र पोलिसांनी त्याचा सर्व बनाव उघडकीस आणत त्याला अटक केली आहे. कैलास जनार्दन खामकर असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे.

‘असा’ झाला पर्दाफाश

एमआयडीसी पोलीस चकाला, अंधेरी पूर्व येथे सिव्हिल ड्रेस क्रॅकडाऊनसाठी निघाले होते. ते चकाल्याकडे निघाले असता त्यांना पान आणि चहाच्या स्टॉलवर एक व्यक्ती दुचाकीजवळ उभा असल्याचे दिसले. त्याने पोलिसांचा गणवेश, लाल शूज आणि कमरेला एक शस्त्रास्त्र होल्स्टर घातले होते. त्याच्याकडे वाहतूक पोलिसांचे हेल्मेट होते, त्याने गणवेशावर शर्ट घातला होता.

एमआयडीसी पोलीस आधी त्या ठिकाणाहून पुढे गेले होते. मात्र थोडं अंतर गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, ट्रॅफिक पोलिसांना रिव्हॉल्वर अजिबात दिली जात नाही, मग त्याने होल्स्टर का लावले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडे येत त्याची चौकशी सुरू केली असता, त्याने आधी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना ओळखपत्र मागितले असता बनाव उघड

तू कोण आहेस आणि ओळखपत्र कसे मागू शकतोस, असे त्याने पोलिसांना विचारले. मग पालवे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याचे ओळखपत्र दाखवले आणि तुम्ही तुमचे ओळखपत्रही दाखवा, असे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याचा सर्व बनाव उघडकीस आला.

एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्यावर कलम 420 आणि 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडे चौकशी केली असता, अटक करण्यात आलेला व्यक्ती घाटकोपर भीम नगर येथील रहिवासी असून, कैलास जनार्दन खामकर असे त्याचे नाव आहे. यापूर्वी तो जेट एअरवेजमध्ये लोडर म्हणून काम करत होता. ठाण्यातील एका शिंपीकडून त्याने हा गणवेश शिवून घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा गणवेश परिधान करून तो हिंडून पैसे गोळा करत असे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.