दोघेही एकत्र बसून दारु पित होते, काही कारणातून दोघांचा वाद झाला, मग पतीने पत्नीला थेट…

दोघेही पती-पत्नी एकत्र दारु प्यायले. मग दोघांमध्ये वाद झाला. वादातून पुढे जे घडलं त्याने परिसरात एकच खळबळ माजली.

दोघेही एकत्र बसून दारु पित होते, काही कारणातून दोघांचा वाद झाला, मग पतीने पत्नीला थेट...
बदलापूरमध्ये पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 5:39 PM

बदलापूर : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमधील मांजर्ली येथे घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करत, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. अनिता विश्वकर्मा असे मयत पत्नीचे नाव आहे. तर ओमप्रकाश विश्वकर्मा असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे मांजर्ली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत. पती-पत्नीमध्ये नेमका काय वाद झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत.

अनेक दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद होता

मांजर्ली परिसरातील दिव्यज्योत अपार्टमेंटमध्ये विश्वकर्मा कुटुंबीय राहते. गेल्या काही दिवसांपासून दोघा पती-पत्नीमध्ये वाद सुरु होता. सोमवारी संध्याकाळी दोघेही पती-पत्नी एकत्र दारु प्यायला बसले होते. यावेळी त्या दोघांमध्ये पुन्हा काही कारणातून वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केली.

आरोपी पतीला अटक

घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. दोघांमध्ये नेमका कशावरुन वाद व्हायचे याबाबत अद्याप कळू शकले नाही. तपासाअंती सर्व स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

अंबरनाथमध्येही महिलेची हत्या

अंबरनाथ पूर्व भागातील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्समधील साई लीला लॉजमध्ये एका महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. हत्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. पोलीस पुढील तपास सुरू करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.