मालमत्तेच्या वादातून पती-पत्नीचे भांडण, मेहुणी सोडवायला गेली अन्…

यावेळी स्थानिकांनी मोहम्मद आयुब शेख याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या हल्ल्यात जखमी झालेल्या निलोफर आणि फरीदा सय्यद यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मालमत्तेच्या वादातून पती-पत्नीचे भांडण, मेहुणी सोडवायला गेली अन्...
भावोजीकडून मेहुणीची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 4:29 PM

बदलापूर : मालमत्तेच्या वादातून झालेलं पती पत्नीचं भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेहुणीची भावोजीने हत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. यावेळी आरोपीने पत्नी आणि सासूवरही हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद आयुब शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पतीसोबत वाद असल्याने पत्नी माहेरी राहत होती

बदलापूर गावातील सनसेट हाईट इमारतीत फरीदा सय्यद या त्यांच्या दोन मुली निलोफर आणि सनोबर, तसंच नातवंडांसोबत राहतात. त्यांची मुलगी नीलोफर ही विवाहित असून, तिचा पतीसोबत वाद सुरू असल्याने ती आईकडेच वास्तव्याला आहे.

सासरवाडीत पत्नीला भेटायला आला अन् हल्ला केला

सोमवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नीलोफरचा पती मोहम्मद आयुब शेख हा सासूच्या घरी राहणाऱ्या आपल्या पत्नीला भेटायला आला. मात्र दरवाजा उघडताच त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने निलोफरवर हल्ला चढवला.

हे सुद्धा वाचा

हल्ल्यात मेहुणीचा मृत्यू तर सासू आणि पत्नी जखमी

या हल्ल्यात निलोफर ही गंभीर जखमी झाली. हे पाहून त्याची मेहुणी सनोबर आणि तिची आई फरीदा या दोघी निलोफरला वाचवायला मध्ये पडल्या. मात्र मोहम्मदने त्या दोघींवरही हल्ला चढवला. यामध्ये सनोबरचा जागीच मृत्यू झाला, तर फरीदा सय्यद जखमी झाल्या.

यावेळी स्थानिकांनी मोहम्मद आयुब शेख याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या हल्ल्यात जखमी झालेल्या निलोफर आणि फरीदा सय्यद यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पती-पत्नीमध्ये प्रॉपर्टीचा वाद होता

मोहम्मद शेख हा दुबईला कामाला होता. पत्नी नीलोफर सोबत त्याचं पटत नसल्यामुळे ते दोघेही वेगळे राहत होते. मात्र जोगेश्वरीच्या प्रॉपर्टीवरून या दोघांमध्ये वाद होते.

याच वादातून ही हत्या झाल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी मोहम्मद आयुब शेख याला पोलिसांनी अटक करून पुढील तपास सुरू केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.