तीन मुलांच्या आईचा दोघांवर जीव जडला, मग लव ट्रँगलमधून जे घडले ते भयंकर

चमेली पतीपासून वेगळी राहत होती. यानंतर तिची अजय यादवशी ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. डिसेंबरपासून दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. यानंतर काही दिवसांनी चमेलीचे अजयचा मित्र उदय शुक्ला याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले.

तीन मुलांच्या आईचा दोघांवर जीव जडला, मग लव ट्रँगलमधून जे घडले ते भयंकर
अनैतिक संबंधातून पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 5:01 PM

वडोदरा : गुजरातमधील वडोदरामध्ये प्रेम करणे एक महिलेला चांगलचे महागात पडले आहे. पतीला सोडून दोन पुरुषांवर महिलेचा जीव जडला आणि यामुळे तिला आपला जीव गमवण्याची वेळ आली. दोघा प्रियकरांनी मिळून महिलेची हत्या करुन पदमला गावातील मिनी नदीवरील पुलावरुन खाली फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. घटनेचा कसून तपास करत पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. अजय यादव आणि उदय शुक्ला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चमेली असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

आधी अजयसोबत लिव्ह इन मध्ये राहत होती

चमेली ही विवाहित असून, तिला तीन मुलंही आहेत. चमेली पतीपासून वेगळी राहत होती. यानंतर तिची अजय यादवशी ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. डिसेंबरपासून दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. अजय हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून, त्याच्या घरच्यांनी गावी त्याचे लग्न ठरवले. यामुळे अजय चमेलीला सोडून गावी गेला. यावरुन दोघांमध्ये खूप भांडणही झाले.

मग अजयच्या मित्रासोबत प्रेमसंबंध जुळले

यानंतर काही दिवसांनी चमेलीचे अजयचा मित्र उदय शुक्ला याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. उदय हा आधीच विवाहित होता. मात्र चमेली उदयवर लग्नासाठी दबाव टाकत होती. यामुळे उदयला तिच्यापासून सुटका हवी होती. उदयने ही बाब अजयला सांगितली. यानंतर दोघा मित्रांनी मिळून चमेलीचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी 14 फेब्रुवारी हा दिवस निवडला.

हे सुद्धा वाचा

दोघांनाही महिलेपासून पिच्छा सोडवायचा होता

उदय शुक्ला चमेलीला आपल्या बाईकवरुन पदमला गावातील मिनी नदीच्या पुलावर घेऊन गेला. तिथे अजय यादव आधीच त्या दोघांची वाट पाहत होता. मग दोघांनी मिळून चमेलीचा गळा आवळला आणि मृतदेह पुलावरुन खाली फेकला. यानंतर दोघे तेथून फरार झाले. पोलिसांना महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी महिलेचा फोटो आजसपासच्या वस्त्यांमध्ये दाखवला.

याचदरम्यान पोलिसांना महिलेची माहिती मिळाली. पोलीस महिलेच्या घरी गेले तर तेथे कुणीच नव्हते. पोलिसांनी आसपास चौकशी केली असता महिलेचे नाव चमेली असल्याचे कळले. पोलिसांनी महिलेच्या घरातून ओळखपत्र हस्तगत केले. यावेळी पोलिसांना महिला अजय यादव नावाच्या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी अजयची चौकशी केली असता तो ही चार दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी अजयचा शोध घेतला आणि सर्व प्रकरण उघड झाले. पोलिसांनी अजय यादव आणि उदय शुक्ला या दोघांना अटक केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.