महिला शेतात काम करत होत्या, अचानक जमिनीतून हात वर आलेला दिसला अन्…

सासरवाडीला गेलेला तरुण घरी परतलाच नाही. मग थेट पोलीसच त्याच्या मृत्यूची बातमी घेऊन घरी आले अन् घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

महिला शेतात काम करत होत्या, अचानक जमिनीतून हात वर आलेला दिसला अन्...
अनैतिक संबंधातून पतीची हत्या
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 10:16 AM

कटिहार : आजकाल नात्यांवर विश्वास ठेवणे कठिण झालं आहे. कोण कुणाचा कधी काटा काढेल हे सांगू शकत नाही. एक तरुण सासरवाडीला जातो सांगून घरुन गेला तो गायब झाला. दहा दिवसांनंतर जे समोर आलं त्याने कुटुंबाला धक्काच बसला. बिहारमधील कटिहार जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आई, भाऊ आणि प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी नीरजची हत्या करुन मृतदेह शेतात पुरला. नीरज महतो असे मयत तरुणाचे नाव आहे.

‘असा’ झाला खुलासा

13 जून रोजी शेतात गवत कापणाऱ्या महिलांना शेतातून एक हात बाहेर आलेला दिसला. ही गोष्ट गावात पसरली आणि स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत शेतात पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी हत्याकांडाचा तपास सुरु केला.

तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. नीरज मानसिकदृष्ट्या कमकुवत होता आणि त्याची पत्नी सोनी देवी हिचे खगरिया येथील बखेरा यादवसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचे होते आणि सोनीची आई निर्मला देवी तिला साथ देत होती. याच कारणातून सासरवाडीला आलेल्या नीरजची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर पत्नी सोनी, सासू निर्मला, मेव्हणा आणि प्रियकर बखेरा यादव यांनी मृतदेह शेतात टाकला.

हे सुद्धा वाचा

पत्नी सोनी देवीने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. सोनी आणि नीरज यांना तीन मुले आहेत. दोघांचा संसार सुरळीत सुरु होता. पण अचानक पतीची मानसिक स्थिती बिघडल्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती ढासळली. दरम्यान, तिचे खगरिया येथील बखेरा यादव यांच्याशी प्रेमसंबंध जुळले. बखेरा तिला आर्थिक मदत करत होता. यानंतर तिने बखेराशी लग्न करण्यासाठी घरच्यांच्या मदतीने पतीची हत्या करण्याचा कट रचला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.