आधी महिलेचे डोळे बाहेर काढले, मग जीभ आणि प्रायव्हेट पार्ट कापला, असं काय घडलं की क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या !

जमिनीवरुन शेजाऱ्यांमध्ये वाद होता. हाच वाद उफाळून आला आणि शेजाऱ्यांनी महिलेसोबत जे केले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

आधी महिलेचे डोळे बाहेर काढले, मग जीभ आणि प्रायव्हेट पार्ट कापला, असं काय घडलं की क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या !
कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवले
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 4:45 PM

खगडिया : बिहारमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून एका महिलेसोबत क्रूर कृत्य करत तिची हत्या करण्यात आली आहे. चौघांनी 45 वर्षीय सुलेखा देवीला जबर मारहाण केली. मग चाकूने तिचे डोळे काढले. त्यानंतर जीभ आणि प्रायव्हेट पार्टही कापला. यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. पसराया पोलीस ठाण्याअंतर्गत बहियार गावात ही घटना घडली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अन्य तीन आरोपी फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे 9 वर्षांपूर्वी या आरोपींनी महिलेचा पती आणि दिराची हत्या केली होती. एक आरोपी नुकताच जामिनावर बाहेर आला होता.

काय आहे प्रकरण?

पीडित महिलेचा शेजाऱ्यांसोबत 5 एकर जमिनीवरुन वाद सुरु होता. याच वादातून आरोपींनी हे क्रूर हत्याकांड घडवले. पीडित महिला शेतात कामावर गेली असताना आरोपी तेथे गेले. त्यांनी महिलेला बेदम मारहाण केली. मग चाकूने तिचे डोळे बाहेर काढले. मग तिची जीभ आणि प्रायव्हेट पार्ट कापला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. 25 एप्रिल 2014 मध्ये महिलेचा पती बबलू सिंह आणि लहान दिराचीही आरोपींनी हत्या केली होती.

नातेवाईकांकडून चक्का जाम

या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ माजली आहे. महिलेच्या हत्येमुळे संतप्त नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम केला. अनेक तास महामार्गावर चक्का जाम झाल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. गोगरीचे एसडीपीओ मनोज कुमार यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. आरोपींना लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासनही दिले. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरुन गुन्ह्यात वापरलेला चाकूही हस्तगत केला आहे.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.