भररस्त्यात महिलेसोबत भयानक कृत्य, हत्येचा थरार कॅमेऱ्यात कैद, कारण काय?
मयत महिला शनिवारी सिंधीया पुलाजवळ बाजारात गेली होती. यावेळी आरोपी मोहम्मद तेथे आला आणि त्याने भर बाजारात महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला सुरु केला.
पटना : श्रद्धा हत्याकांडाने देशभर खळबळ माजली असतानाच बिहारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भररस्त्यात एका महिलेची क्रूर हत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. बाजारात गेलेल्या एका महिलेवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली. हत्येचा थरार उपस्थित नागरिकांनी मोबाईल कैद केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतेदह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठण्यात आला. हत्या करणाऱ्या आरोपीची ओळख पटली असून, मोहम्मद शकील असे आरोपीचे नाव आहे.
भर बाजारात महिलेला भोसकले
मयत महिला शनिवारी सिंधीया पुलाजवळ बाजारात गेली होती. यावेळी आरोपी मोहम्मद तेथे आला आणि त्याने भर बाजारात महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला सुरु केला. आरोपीने महिलेच्या हात-पाय, छाती, कान कापले. काय घडतंय हे नागरिकांच्या लक्षात येण्याआधीच आरोपी तेथून पसार झाला.
उपस्थित लोकांनी महिलेच्या पती आणि पोलिसांना माहिती दिली
बाजारात उपस्थित लोकांनी महिलेला ओळखले. त्यांनी महिलेच्या पतीला घटनेची माहिती दिली. पीरपैती पोलिसांना हत्येची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
महिलेने जखमी अवस्थेत आरोपीचे नाव सांगितले आहे. मुख्य आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
तपासाअंती हत्येचे कारण कळेल
दरम्यान, महिलेवर हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस तपासानंतरच हल्ल्याचे कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.