Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाला दोन महिने झाले तरी पत्नी सासरी येईना, अखेर हताश पतीने उचललं हे टोकाचं पाऊल

लग्न थाटामाटात पार पडले. लग्नानंतरच्या सर्व विधी झाल्या. पण नववधूची माहेरचे लोक पाठवणीच करत नव्हते. अखेर नवरदेव हताश झाला.

लग्नाला दोन महिने झाले तरी पत्नी सासरी येईना, अखेर हताश पतीने उचललं हे टोकाचं पाऊल
लग्नमंडपात वीजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 5:17 PM

आरा : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर माहेरचे रीतीरिवाज पार पाडण्यासाठी मुलगी वधू माहेरीच राहत होती. लग्नाला दोन महिने झाले तरी सासरवाडीतले लोक मुलीची पाठवणी करत नव्हते. अखेर तरुण हताश झाला आणि त्याने आपले जीवन संपवले. कृष्ण कुमार असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

लग्नानंतरचे रीतीरिवाज पार पाडण्यासाठी पत्नी राहत होती

कृष्ण कुमारचा 14 एप्रिल रोजी एकवारी गावातील रीमा कुमारीसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर माहेरचे काही रीतीरिवाज पार पाडण्यासाठी मुलगी काही दिवस माहेरी राहिल अशी बोलणीच लग्नाआधी झाली होती. त्यानुसार सासरच्यांनी वधूला तिच्या माहेरी ठेवले. यानंतर मयत तरुण मुंबईत भाजीचा धंदा करत असल्याने सर्वजण मुंबईला परतले. मात्र रीतीरिवाजाच्या नावाखाली दोन महिने झाले तरी नवरी सासरी परतली नाही. यामुळे कृष्ण कुमार गावी गेला.

पत्नी घरी येत नसल्याने नैराश्येतून टोकाचे पाऊल

कृष्ण कुमार 4 जूनला पत्नीला आणण्यासाठी गावी गेला. त्यानंतर त्याने वडिलांना आपण सासरवाडीत पत्नीला आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर थेट त्याच्या मृत्यूचीच बातमी आली. कृष्ण कुमारने आत्महत्या करण्यापूर्वी बहिणीला फोन करुन माहिती दिली. बहिणीने त्याच्या सासरवाडीत याबाबत माहिती दिली. सासरवाडीतल्या लोकांनी तात्काळ कृष्ण कुमारच्या घरी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेश शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलील पुढील तपास करत आहेत. पत्नी सासरी नांदायला येत नव्हती. यामुळे तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.