महिनाभरापूर्वी पतीचे निधन झाले, आता महिलेचा दुर्दैवी अंत, काय घडले नेमके?

पतीच्या निधनानंतर वृद्ध महिला घरी एकटीच राहत होती. तिची विवाहित मुलगी नागपुरात राहते. काल संध्याकाळी शेजारी महिलेला पहायला घरी गेले तर समोर धक्कादायक दृश्य दिसले.

महिनाभरापूर्वी पतीचे निधन झाले, आता महिलेचा दुर्दैवी अंत, काय घडले नेमके?
चंद्रपूरमध्ये पैशाच्या वादातून भाडेकरुने मालकिणीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 3:05 PM

निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील नगीनाबाग परिसरात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भाडेकरुने घरी एकट्या असलेल्या वृद्ध मालकिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. थकीत भाड्यावरुन झालेल्या वादातून हत्या केली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी भाडेकरुला पोलिसांनी अटक केली आहे. शर्मिला सकदेवे असे मयत 65 वर्षीय महिलेचे नाव आहे, तर अनुप कोहपरे असे आरोपी भाडेकरुचे नाव आहे. महिनाभरापूर्वीच महिलेच्या पतीचे निधन झाले आहे.

एक महिन्यापूर्वी महिलेच्या पतीचं निधन

शर्मिला सकदेवे यांचं नाव बौद्ध विहार परिसरात दोन मजली घर आहे. काल त्या घरी एकट्या असताना संध्याकाळी शेजाऱ्यांना त्यांचा मृतदेह आढळून आला. वनविभागातून निवृत्त झालेल्या त्यांच्या पतीचं महिन्याभरापुर्वीच निधन झालं होतं. शर्मिला यांना विवाहित मुलगी असून, ती नागपुरात राहते. यामुळे शर्मिला या घरी एकट्याच राहत होत्या.

थकीत भाड्यावरुन झालेल्या वादातून हत्या

आरोपी अनुप कोहपरे हा शर्मिला यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहत होता. अनुपने घराचे भाडे दोन महिन्यांपासून दिले होते. यावरुन काल दुपारी शर्मिला यांचे भाडेकरू सोबत भांडण झाले आणि याच भांडणात आरोपी अनुप कोहपरे याने तिची हत्या केली. संध्याकाळी शेजाऱ्यांनी पाहिले असता घटना उघडकीस आली.

हे सुद्धा वाचा

शेजाऱ्यांनी रामनगर पोलिसांनी घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवत पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात भाडेकरुनेच महिलेची हत्या केल्याचे उघड होताच पोलिसांनी अनुप कोहपरेला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.