AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगा घरी आला तर दाराला कुलूप दिसले, घराच्या मागच्या बाजूने घरी प्रवेश केला, आत पाहिले तर पायाखालची जमीनच सरकली !

मुलाला ड्रग्जचे व्यसन होते. यामुळे तो वडिलांकडे वारंवार पैशाची मागणी करायचा. यातून त्याचे वडिलांशी वाद व्हायचे. अखेर एक दिवस या वादाचा करुण अंत झाला.

मुलगा घरी आला तर दाराला कुलूप दिसले, घराच्या मागच्या बाजूने घरी प्रवेश केला, आत पाहिले तर पायाखालची जमीनच सरकली !
पैसे आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने माता-पित्यासह आजीला संपवलेImage Credit source: tv9
| Updated on: May 19, 2023 | 6:54 PM
Share

महासमुंद : छत्तीसगडमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पैसे आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने जे केले ते पाहून तुम्हालाही संताप अनावर होईल. मुलाने पैसे आणि अनुकंपा तत्वावर नोकरीच्या लालसेपोटी आपल्या आई-वडिलांची आणि आजीची हत्या केली. त्यानंतर दोन दिवस मृतदेह घरी लाकूड आणि सॅनिटायझर टाकून जाळण्यात आले. यानंतर वडिलांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. आई-वडिल बेपत्ता असल्याचे समजताच शिक्षणासाठी परगावी राहणारा छोटा मुलगा घरी आला. यानंतर सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे मृत शिक्षकाचा मोठा मुलगा उदित याची कसून चौकशी केली. चौकशीत त्याने आई-वडील आणि आजीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

महासमुंद जिल्ह्यातील सिघोडा पोलीस स्टेशन हद्दीतील पुटका गावात ही घटना घडली आहे. शिक्षक प्रभात भोई हे पत्नी सुलोचना भोई आणि 75 वर्षीय आई झरना भोई यांच्यासह पुटका गावात राहत होते. प्रभात यांचा मुलगा उदितही त्यांच्यासोबत राहत होता. शिक्षकाचा छोटा मुलगा रायपूरमध्ये एमबीबीएस करत आहे. प्रभातचा मोठा मुलगा उदित भोई याला ड्रग्जचे व्यसन होते. यामुळे पैशासाठी तो अनेकदा आई-वडिलांशी भांडत असे.

वडिलांशी वाद झाल्यानंतर मुलाने तिघांना संपवले

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे 7 मे रोजी शिक्षक प्रभात भोई आणि त्यांचा मुलगा उदित यांच्यात पैशांवरून वाद झाला. यानंतर उदितने वडिलांच्या हत्येचा कट रचला. घरातील सर्वजण झोपल्यावर उदितने मध्यरात्री 2 ते 3 च्या दरम्यान आधी वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. यानंतर आई सुलोचनाची हत्या केली. यादरम्यान आजीला जाग आल्याने त्याने तिलाही संपवले.

आई-वडील आणि आजीची हत्या केल्यानंतर उदितने मृतदेह घरातील बाथरूममध्ये ठेवले. मग दुसऱ्या दिवशी लाकूड आणि सॅनिटायझर टाकून तिघांचेही मृतदेह घरामागे दोन दिवस जाळले. यानंतर आरोपी मुलाने 12 मे रोजी सिंगोडा पोलिस ठाण्यात वडील, आई आणि आजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

लहान मुलगा घरी आला तर घराला कुलूप होते

भोई यांचा लहान मुलगा अमित याला आई-वडील आणि आजी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ गाव गाठले. तो घरी आला तर घराला कुलूप होते. अमित रायपूरमध्ये एमबीबीएस करत आहे. त्याचा भाऊ उदितही घरी नव्हता. यानंतर अमितने घराच्या मागच्या बाजूने उडी मारून घरात प्रवेश केला. घरात पाय ठेवताच आत रक्ताचे डाग दिसले आणि घराच्या आवारात काहीतरी जळाल्याच्या खुणा तसेच मानवी हाडे दिसली. अमितने सिंगोडा पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली.

आरोपी उदित भोई हा वडिलांच्या मोबाईलवरून भाऊ अमित आणि इतर नातेवाईकांना आपण सुखरूप असल्याचे मेसेज पाठवत होता. त्यामुळे सर्वांना प्रभात सुरक्षित असल्याचे वाटले. अमित याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता घटनास्थळा जवळील लोकेशन आढळून आले. यानंतर पोलीस तपासासाठी भोई यांच्या घरी पोहोचले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्याचे आणि मृतदेह जाळल्याच्या खुणा दिसल्या. राखेत मानवी अवशेषही होते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.