अनैतिक प्रेमात आंधळी झाली, पतीला सोडून प्रियकराकडे गेली, मग…

पतीला सोडून परपुरुषाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मग पतीला घटस्फोट देत त्याच्याशी लग्नही केलं. पण तिचा हा निर्णय तिच्या जीवावर बेतला.

अनैतिक प्रेमात आंधळी झाली, पतीला सोडून प्रियकराकडे गेली, मग...
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 10:22 AM

बल्लभगड : हरयाणात फरीदाबादजवळील बल्लभगडच्या आदर्श कॉलनीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आली आहे. यानंतर पतीने पत्नीचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन अंतिम संस्कार करण्यास सुरुवात केली. मात्र शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली आणि त्याचा भांडाफोड झाला. पोलिसांनी चिता विझवून अर्धवट जळालेला मृतदेह शवविच्छेदनासा सविता असे मयत महिलेचे तर कृष्णा असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे.

पहिल्या पतीला घटस्फोट देत दुसरा विवाह केला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सविताचा विवाह यापूर्वी 2015 मध्ये गौंची येथील रविशी झाला होता. सविता पतीसोबत बल्लभगडच्या आदर्शनगरमध्ये राहत होती. आरोपी कृष्णा हा सविताच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाकडे येृजा करायचा. यावेळी त्याची ओळख सविताशी झाली. मग कृष्णाने सविताला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर सविताने पहिल्या पतीला घटस्फोट देत 2015 मध्ये कृष्णासोबत विवाह केला. मात्र दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. पीडितेच्या वडिलांचे म्हणणे आहे की, कृष्णा त्यांच्या मुलीला मारहाण करायचा.

अंत्यसंस्कार सुरु असतानाच पोलीस हजर झाले अन्…

वडील विजेंदर यांनी सांगितले की, आज ते नेहरू कॉलनीतील त्यांच्या घरी होते, तेव्हा पोलीस त्यांच्या घरी आले आणि त्यांना त्यांच्या मुलीसोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ते पोलिसांसह स्मशानभूमीत पोहोचले. तिथे त्यांना कृष्णा त्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार करत असल्याचे दिसले. पोलिसांनी आग विझवून मृतदेह ताब्यात घेतला. मृत सविताचे वडील विजेंदर यांनी आरोप केला आहे की, कृष्णाने आपल्या मुलीची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.