आधी पतीला संपवले, मग वटसावित्रीने सामान खरेदी करायला गेली, पत्नीने टोकाचे पाऊल का उचलले?

पत्नी वटसावित्रीचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती. घरी परतली तर पतीसोबत भयंकर घटना घडली होती. तिने पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलिसांच्या तपासात जे समोर आलं धक्कादायक.

आधी पतीला संपवले, मग वटसावित्रीने सामान खरेदी करायला गेली, पत्नीने टोकाचे पाऊल का उचलले?
कल्याण स्थानकात तरुणीची छेडछाड
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 10:23 PM

रांची : झारखंडमध्ये येत्या शुक्रवारी वटसावित्रीचा सण साजरा केला जात आहे. त्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या जोरदार तयारी सुरु आहे. याचदरम्यान एका महिलेने आपल्या पतीच्या हत्येचा कट यशस्वी केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. रांचीच्या रातू पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंदपूर येथे घडलेल्या या घटनेची उकल झाल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे. विशेष म्हणजे, पत्नीने हत्येच्या कटातील तिचा सहभाग उघड होऊ नये, म्हणून पतीवरील निष्ठा दाखवण्यासाठी वटसावित्रीच्या पूजेची सर्व तयारीही केली होती. मात्र पोलिसांनी हत्येची कसून चौकशी केल्यानंतर अखेर सत्य समोर आले आहे. हत्या झालेल्या जमीन व्यावसायिक राजकुमार शाही यांना ठार करण्यामागे त्यांची पत्नी सोनी देवी हिचाच हात असल्याचे उघडकीस आले.

मारेकरी पत्नीने वटपूजेची खरेदीही केली होती!

सर्व विवाहित महिला पतीच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटपूजेची तयारी करीत आहेत. आरोपी सोनी देवी हिनेही वटपूजेची तयारी केली होती. तिने वटपूजेसाठी लागणारे सर्व साहित्य घरी आणून ठेवले होते. मात्र वटपूजा करण्याआधीच तिने पतीच्या हत्येचा कट यशस्वी केला. हे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. कुणालाही संशय येऊ नये म्हणून सोनी देवी हिने वटपूजेची खरेदी केली होती. तिने भाऊ सचिंद्रनाथ मिश्राच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियातून घेतल्या पुरावे नष्ट करण्याच्या आयडिया

सोनी देवीने हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याबाबत सोशल मीडियातून आयडिया घेतल्या होत्या. तिचा पती राजकुमार शाही याच्यासोबत वारंवार वाद व्हायचा. याच वादाला वैतागून तिने पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला होता. मंगळवारी दुपारी राजकुमारचा मृतदेह त्याच्या खोलीत रक्ताने माखलेल्या मच्छरदाणीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला होता. सोनी देवी हिने आपण वटपूजेची खरेदी करण्यासाठी बाजारात गेली असताना अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचा बनाव रचला होता. घरी परतल्यावर पतीचा मृतदेह पाहून धक्का बसल्याचा दावा तिने पोलिसांपुढे केला होता.

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.