मुलीने प्रेमाला नकार दिल्याने आधी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, पीडितेने विरोध करताच केले असे
मुलीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तिच्या आई आणि भावालाही आरोपीने मारहाण केली. यानंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी पाकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पलामू : प्रेमाला नकार दिल्याने एका सनकी प्रियकराने अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील पलामू जिल्ह्यात घडली आहे. मुलीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तिच्या आई आणि भावालाही आरोपीने मारहाण केली. यानंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी पाकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अमित कुमार असे आरोपीचे नाव आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
काय आहे प्रकरण?
आरोपी अमित कुमारचे पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र मुलीचा या प्रेमाला नकार होता. यामुळे सनकी प्रियकराने आधी मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने विरोध केला असता आरोपीने तिची गळा दाबून हत्या केली.
यावेळी पीडितेची आई आणि भाऊ तिला वाचवण्यासाठी आले असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह फासावर लटकवला आणि तेथून फरार झाला.
पीडित मुलीचे वडिल पंजाबमधील लुधियानात नोकरी करतात. त्यामुळे घरामध्ये आई, भाऊ आणि पीडित मुलगी तिघेच राहत होते. याचा फायदा घेत आरोपी मुलीच्या घरात घुसला.
पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरु
पीडित अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी अनेक सवाल उपस्थित होत आहेत. अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर बराच वेळ कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली नव्हती. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
आरोपीने याआधीही मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हे प्रकरण पंचायतीत गेले होते. पंचायतीत या प्रकरणी समझोताही झाला होता.