पोलिसांच्या भीतीने भरधाव वेगात पळत होती जुगाड गाडी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…

दिग्गी बकनपूर येथे बेकायदेशीर कोळसा उत्खनन आणि वाहतूक सुरु आहे. या गाडीचा वापर कोळसा वाहतूक करण्यासाठी केला जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो पळून जात होता.

पोलिसांच्या भीतीने भरधाव वेगात पळत होती जुगाड गाडी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्...
बस आणि कार अपघातात तीन तरुण ठारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 9:57 PM

गोड्डा : कोळसा उतरविल्यानंतर पोलिसांच्या भीतीने भरधाव वेगात धावणाऱ्या जुगाड वाहनाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरात घुसल्याने आजी नातीचा जागीच मृत्यू झाला. शिवाय दोन गुरेही दगावली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. नर्गिस खातून आणि फारिया खातून अशी अपघातात मृत्यू झालेल्या आजी-नातीची नावे आहेत. घटनेनंतर वाहन चालक फरार झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

परिसरात बेकायदेशीर कोळसा उत्खनन आणि वाहतूक सुरु

दिग्गी बकनपूर येथे बेकायदेशीर कोळसा उत्खनन आणि वाहतूक सुरु आहे. या गाडीचा वापर कोळसा वाहतूक करण्यासाठी केला जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो पळून जात होता.

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन घरात घुसले अन्…

पळून जाण्याच्या नादात चालकाचे गाडीवरूल नियंत्रण सुटले आणि वाहन एका घरात घुसले. या घटनेत आजी आणि नात गंभीर जखमी झाल्या. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच एक गाय आणि शेळीही या अपघातात ठार झाल्या.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून वाहन चालकाचा शोध सुरु

घटनेनंतर संधी साधत वाहन चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. स्थानिक पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.