इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात पडली, गुंगीचे औषध देत महिला कॉन्स्टेबलसोबत…
सोशल मीडियावर मैत्री करणं एका महिला कॉन्स्टेबलला चांगलेच महागात पडले आहे. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले, मग नको ते घडले.
कल्याण : सोशल मीडियावरील मैत्रीतून फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सोशल मीडियावर मैत्री करणं आणि प्रेमसंबंध जोडणं तरुणाईचं फॅडचं झालं आहे. मात्र सोशल मीडियातून झालेल्या प्रेमसंबंधामुळे तरुणींसोबत भयंकर प्रकार घडत असतात. कल्याण कोळसेवाडी परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर केलेली मैत्री एका महिला पोलिसाला चांगलीच महागात पडले आहेत. गुंगीचे औषध देत महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून पीडितेबरोबर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार
पीडित महिला मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवर आकाश घुले या तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. भेटण्याच्या बहाण्याने आकाश तिच्या राहत्या घरी गेला. त्यानंतर तिला थंड पेयातून गुंगीचे औषध दिले आणि लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर शारिरीक अत्याचार केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत वारंवार महिलेवर अत्याचार केले. यानंतर महिला वारंवार त्याच्याकडे लग्नाची मागणी करु लागली. मात्र जातीचे कारण सांगत त्याने लग्नाला नकार दिला.
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रकरणी पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी आकाश घुले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध सुरू केला आहे. अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मैत्री करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.