शेजारणीशी उद्धट बोलला, तरुणीसह कुटुंबीयांनी तरणाला बेदम चोपला; व्हिडिओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ कल्याण पश्चिमेमधील वडवली गावातील असून, तरुण आणि मारहाण करणारे कुटुंब शेजारी राहतात. काही दिवसांपासून दोघांमध्ये आर्थिक व्यवहार सुरू होता.

शेजारणीशी उद्धट बोलला, तरुणीसह कुटुंबीयांनी तरणाला बेदम चोपला; व्हिडिओ व्हायरल
आर्थिक अडचणीला कंटाळलेल्या कामगाराने जीवन संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 6:43 PM

कल्याण / सुनील जाधव (प्रतिनिधी) : शेजारणीला उद्धट बोलल्याच्या रागातून तरुणीसह तिच्या कुटुंबीयांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमधील वडवली गावात घडली आहे. मारहाण करुन पाया पडायला लावण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत आरोपी आणि पीडिताचा शोध सुरु केला आहे. आरोपी आणि पीडिताचा शोध घेण्यासाठी खडकपाडा पोलिसांनी तीन टीम तैनात तयार केल्या आहेत. सर्व टीम वडवली परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत.

पीडित आणि आरोपी कुटुंबीय शेजारी राहतात

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ कल्याण पश्चिमेमधील वडवली गावातील असून, तरुण आणि मारहाण करणारे कुटुंब शेजारी राहतात. काही दिवसांपासून दोघांमध्ये आर्थिक व्यवहार सुरू होता.

महिलेला उद्धट बोलला म्हणून तरुणाला मारहाण

मात्र तरुणाने महिलेला उद्धट बोलल्याने संतापलेल्या तरुणीने आणि तिच्या कुटुंबीयांनी या तरुणाला हाताने लाकडी झाडूने बेदम मारहाण केल्याची माहिती मिळते. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस अॅक्शन मोडमध्ये

व्हिडिओ व्हायरल होताच खडकपाडा अॅक्शन मोडमध्ये आले. व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी मारहाण करणाऱ्या कुटुंबीयांचा आणि पीडित तरुणाचा शोध सुरु केला आहे. तपासाअंतीच मारहाणीचे खरे कारण उघड होईल.

पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून गावगुंडांची कुटुंबाला मारहाण

रस्ता खोदल्याची पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून गावगुंडानी एका कुटुंबाला मारहाण केल्याची घटना पुण्यातील मावळ तालुक्यात घडली आहे. मावळ तालुक्यातील शिवली गावात राहणाऱ्या कदम कुटुंबियांना ही मारहाण करण्यात आली.

पूर्वीपासूनचा येण्या जाण्याचा रस्ता खोदल्यामुळे त्यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. या तक्रारीचा राग मनात ठेवून गावातील कदम कुटुंबाला गावगुंडांनी फावडे, दगडाने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शिवली येथे घडली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.