कल्याणला तो घरी एकाच वेळेस 2 कॉलगर्ल बोलवायचा, पण तो एकेदिवशी काही क्षणात असा कायमचा वाया गेला !
पत्नीपासून विभक्त झाला. मग कॉलगर्ल बोलावू लागला. तीन नित्यनेमाने या कॉलगर्ल्सच्या त्याच्या घरी येऊन त्याला खूश करत होत्या. पण एके दिवशी जे घडलं त्याने संपूर्ण जिल्हाच हादरला.
कल्याण : पती-पत्नीमध्ये काही वाद होते. यामुळे मुलांसह पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर पती एकटाच घरी राहत होता. पत्नी जवळ नसल्याने शारीरिक भूक मिटवण्यासाठी त्याने कॉल गर्लचा पर्याय अवलंबला. गेली तीन वर्ष ती कॉलगर्ल त्याच्याकडे येत होती. आधी एकटीच येत होती, मग मैत्रिणीलाही सोबत घेऊन लागली. त्याची शरिराची भूक मिटत होती आणि त्यांची पैशांची गरज भागत होती. त्याचा स्वतःचा व्यवसाय होता. त्यामुळे त्याच्याकडे पैशाची कमी नव्हती. तीन त्याच्यासोबत घालवल्यानंतर अर्थातच त्या कॉल गर्ल्सना याबाबत सर्व माहिती झाली होती. यामुळेच त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे आपला प्लान आखला आणि यशस्वीही केला. घटना उघड होताच केवळ कल्याणच नव्हे, संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
कॉलगर्ल्सनीच आपल्या प्रियकरांच्या मदतीने त्याचा काटा काढला. कॉल गर्ल्सच्या नादात 42 वर्षीय इसमाने आपला जीव गमावला. दीपक कुऱ्हाडे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. घटना उघड होताच वेगाने तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी घटनेचा उलगडा केला. याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे, तर एक जण फरार आहे. फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. शिवानी, भारती आणि संदीप पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर देवा रॉय असे फरार आरोपीचे नाव आहे.
काय घडलं नेमकं?
कुऱ्हाडे हे पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर तीन वर्षापासून शारिरीक गरज पूर्ण करण्यासाठी घरी कॉल गर्ल बोलवायचा. या मुलींवर ते भरपूर पैसे उधळायचा. यामुळे कुऱ्हाडे यांच्याकडे भरपूर पैसा असल्याची कल्पना या कॉल गर्ल्सना आली. त्यातच काही दिवसांपूर्वी कुऱ्हाडे यांनी आरोपी शिवानी हिला शिवीगाळ केली होती. यामुळे याचा रागही तिच्या मनात होताच. दोघींनी प्रियकरांच्या मदतीने कुऱ्हाडे यांची हत्या करुन त्यांच्याकडील पैसे चोरण्याचा प्लान केला. त्यानुसार 30 जून 2023 रोजी शिवानी आणि भारती नेहमीप्रमाणे रात्री कुऱ्हाडे याच्या घरी गेल्या.
नेहमीप्रमाणे त्यांनी कुऱ्हाडेसोबत आधी शारिरीक संबंध ठेवले. मग त्या भरपूर दारु पाजली. यानंतर आपले प्रियकर संदीप पाटील आणि देवा रॉय यांना फोन करुन बोलावले. यानंतर या चौघांनी दारुची बाटली डोक्यात फोडून त्याची हत्या केली. मग जी रक्कम हाती लागली ती घेऊन चौघेही दाराला बाहेरुन कडी लावून दुचाकीवरुन पळून गेले. तीन दिवसांनंतर 2 जुलै रोजी कुऱ्हाडेची आई त्याला कॉल करत होती. पण तो कॉल उचलत नव्हता. यामुळे आईने त्याच्या विभक्त पत्नीला फोन करुन पाहण्यास सांगितले.
यानंतर कुऱ्हाडेची मुलगी वडिलांच्या घरी आली, तर बाहेरुन कडी लावलेली होती. तिने कडी काढून दरवाजा उघडून पाहिला अन् तिला मोठा धक्काच बसला. घरात वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पडघा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला.
पोलिसांनी कुऱ्हाडेच्या मोबाईल कॉल्सचे डिटेल्स, तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिवानीचा शोध घेतला. यानंतर शिवानीला उल्हासनगरमधून अटक केली. पोलीस चौकशीत तिने दिलेल्या माहितीवरुन अन्य दोन आरोपी भारती आणि संदीप यांना अटक केली. तर चौथा साथीदार देवा फरार असून, पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. अटक आरोपींकडून 30 हजार रुपये रोख, चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.