रांगेत ये पेट्रोल टाकतो म्हटले, संतप्त तरुणाने पेट्रोल पंपावरील नोझलच खेचले !

दोन तरुण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. मात्र त्यांना रांगेत उभे न राहता थेट पुढे जाऊन पेट्रोल भरायचे होते. पण कर्मचाऱ्यांनी त्यांना रांगेत उभे रहायला सांगितले. यावरुन पेट्रोल पंपावर भलताच राडा पहायला मिळाला.

रांगेत ये पेट्रोल टाकतो म्हटले, संतप्त तरुणाने पेट्रोल पंपावरील नोझलच खेचले !
पेट्रोल भरायला आलेल्या तरुणांकडून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 9:15 PM

कल्याण / सुनील जाधव : पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभे रहायला सांगितले म्हणून दोन तरुणांनी पेट्रोल पंपावरीवल कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. कल्याणमधील बैलबाजार परिसरातील हिंद ऑटोमोबाईल्स पेट्रोलपंपावर ही घटना घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पेट्रोल पंपाचे मालक शैलेश रामचंद काकराणी यांनी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काकराणी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुकलीस मोहसीन फक्की आणि जावेद असमत डॉन अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

काय आहे प्रकरण?

हिंद ऑटोमोबाईल्स पेट्रोलपंपावर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दोन तरुण स्कूटीवरुन पेट्रोल भरण्यासाठी आले. यावेळी आधीच पेट्रोल पंपावर वाहनांची रांग लागली होती. मात्र सदर तरुण थेट पुढे आले आणि आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यास सांगत दमदाटी करु लागले. मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने त्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. तरुणांना या गोष्टीचा राग आला. एका तरुणाने पेट्रोल पंपावरील नोझल खेचून स्वतः पेट्रोल भरण्याचा प्रयत्न करु लागला.

मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून नोझल काढून घेण्याचा प्रयत्न केला असता तो झटापट करु लागला. सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नोझल खेचून घेतल्यानंतर तरुणांनी पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. यानंतर दोघेही स्कूटीवर बसून निघून गेले.

हे सुद्धा वाचा

यानंतर कर्मचाऱ्यांनी मालक शैलेश काकराणी यांना घटनेची माहिती दिली. काकाराणी यांनी तात्काळ मॅनेजरला सीसीटीव्हीचे फुटेज घेऊन पोलीस ठाण्यात पाठवले. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्कूटीच्या क्रमांकावरुन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.