AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण काळा तलाव परिसरात गोळीबार, ‘या’ कारणातून तरुणाला मारहाण करत गाड्या फोडल्या !

कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारी घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. सतत या ना त्या कारणाने गोळीबार, तोडफोड या घटना घडत असतात.

कल्याण काळा तलाव परिसरात गोळीबार, 'या' कारणातून तरुणाला मारहाण करत गाड्या फोडल्या !
कल्याणमध्ये दहशत पसरवण्यासाठी दोघांकडून गोळीबारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 21, 2023 | 12:51 PM
Share

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. भररस्त्यात गुन्हेगारांकडून गुन्ह्याचं सत्र सुरु आहे. यावरुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे दिसून येते. गुन्हेगार परिसरात आपली दहशत निर्माण करत आहेत, मात्र पोलीस कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याचे दिसत आहे. यामुळे गुन्हेगार सोकावले आहेत. कल्याणमधील काळा तलाव परिसरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. परिसरात दहशत माजवण्यासाठी दोन तरुणांनी पिस्तुलने गोळीबार केल्याची घटना घडली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. गोळीबार केल्यानंतर परिसरातील गाड्यांची तोडफोड करत एका तरुणालाही मारहाण केली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पत्ता सांगितला नाही म्हणून तरुणाला मारहाण

विवेक नायडू आणि प्रथमेश ठमके अशी गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपींचा काळा तलाव परिसरातील चंदन भदोरिया नावाच्या व्यक्तीशी जुना वाद होता. याच कारणातून आरोपी मध्यरात्री त्याला शोधण्यासाठी आले होते. यावेळी आरोपींनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पीडित तरुणाला चंदनचा पत्ता विचारला. मात्र तरुणाने माहित नसल्याचे सांगितले. यानंतर आरोपींनी तरुणाला मारहाण केली.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

परिसरातील गाड्यांची तोडफोड केली, गोळीबार केला. जवळपास अर्धा पाऊण तास आरोपींनी परिसरात धिंगाणा घातला होता. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढीळ कार्यवाही करत आहेत. सतत घडणाऱ्या गोळीबार आणि तोडफोडीसारख्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावी अशी नागरिकांची मागणी आहे.

मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.