आईच्या अनैतिक संबंधावरुन मित्र टोमणे मारायचे, संतापलेल्या मुलाने आईच्या प्रियकराला ‘अशी’ घडवली अद्दल
मुलासमोर आईच्या अनैतिक संबंधाबाबत बोलले जात असल्याने आरोपी तरुण संतापाने पेटून उठला आणि त्याने आईच्या प्रियकराची बेदम मारहाण करून हत्या केली.
कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये अनैतिक संबंधाच्या कारणावरून हत्याकांड घडल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. हे हत्याकांड घडण्यामागे आरोपीच्या मातेचे अनैतिक संबंध कारणीभूत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या आईचे परिसरातील एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाबाबत परिसरात चर्चा केली जात होती. मुलासमोर आईच्या अनैतिक संबंधाबाबत बोलले जात असल्याने आरोपी तरुण संतापाने पेटून उठला आणि त्याने आईच्या प्रियकराची बेदम मारहाण करून हत्या केली. या घटनेने कानपूर शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांनी मारेकरी तरुणासह त्याच्या आईला आणि मित्राला अटक केली आहे. आईच्या विवाहबाह्य संबंधामुळे मुलाने हे गुन्हेगारी कृत्य केल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
कानपूर शहरात 14 जानेवारीला एक धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात आठवडाभराने पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव पंकज असून त्याने त्याच्या आईसोबत विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या दीपक नावाच्या व्यक्तीची बेदम मारहाण करून हत्या केली.
घटना घडली त्या दिवशी पंकज हा आपल्या मित्रमंडळींसोबत चौकामध्ये बसला होता. त्याच दरम्यान त्याच्यासमोर त्याच्या आईच्या विवाहबाह्य संबंधाबाबत चर्चा केली जात होती. त्यामुळे अपमानित झालेल्या पंकजने रागाच्या भरात दीपकला गाठून त्याची हत्या केली. बदन सिंह नावाच्या मित्राच्या मदतीने पंकजने दीपकचा काटा काढल्याचे उजेडात आले आहे.
परिसरातील अन्य चौघे रहिवाशी पोलिसांच्या ताब्यात
कानपूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत. आरोपी तरुणाची आई आणि तिच्या प्रियकराचे विवाहबाह्य संबंध परिसरातील इतर काही लोकांना माहिती होते.
मागील अनेक दिवसांपासून या विवाहबाह्य संबंधाबाबत सार्वजनिक ठिकाणी चर्चा केली जात होती. या संबंधातून महिलेचा प्रियकर दीपक याची हत्या करण्यात आल्याची माहितीही रहिवाशांना होती. मात्र रहिवाशांनी गुन्ह्याची माहिती पोलिसांना न देता लपवून ठेवली.
पोलिसांकडे ही माहिती उघड न केल्यामुळे काहीजण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याच संशयातून पोलिसांनी परिसरातील चौघा रहिवाशांना ताब्यात घेतले आहे. त्यांची सध्या कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती डीसीपी विजय ढुल यांनी दिली.