आई-वडिल लग्नाला तयार नव्हते, मग प्रियकराने मुलीच्या बापाला फोनवर म्हणाला ‘तुमची मुलगी…’, मग जे घडले ते…

मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यांना लग्न करायचे होते. पण मुलगी अल्पवयीन असल्याने आई-वडिलांनी लग्नाला नकार दिला. मग तरुणाने वेगळीच शक्कल लढवली. पण यानंतर लग्नाचे स्वप्न कायम अधुरेच राहिले.

आई-वडिल लग्नाला तयार नव्हते, मग प्रियकराने मुलीच्या बापाला फोनवर म्हणाला 'तुमची मुलगी...', मग जे घडले ते...
अनैतिक संबंधाच्या वादातून पुतण्याने काकीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 10:19 AM

कानपूर : प्रेमात पडणे एका अल्पवयीन मुलीला चांगलेच महागात पडले आहे. पित्याने प्रेमात पडलेल्या अल्पवयीन मुलीला संपवल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. मुलीच्या घरचे लग्नाला परवानगी देत नव्हते. परवानगगी मिळवण्यासाठी मुलाने फोन करुन खोटे सांगितले. पण हे खोटे बोलणेच मुलीच्या जीवावर बेतले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. श्याम बहादूर असे हत्या करणाऱ्या आरोपी बापाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

कानपूरच्या रावतपूर परिसरात राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीचे परिसरातील सोनू नामक तरुणाशी प्रेमसंबंध सुरु होते. तरुणाला मुलीसोबत लग्न करायचे होते. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या घरचे तयार नव्हते. यामुळे मुलीच्या घरच्यांची परवानगी मिळवण्यासाठी तरुणाने शक्कल लढवली. पण हीच शक्कल त्याच्या प्रेयसीच्या जीवावर बेतली.

तरुणाने मुलीच्या बापाला फोन करुन सांगितले की, ‘माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे, ती गरोदरसुद्धा आहे. त्यामुळे मी तिच्याशी लग्न करेन, आमचे लग्न करुन द्या’. हे ऐकताच मुलीच्या वडिलांचा संताप अनावर झाला. बापाने घरी जाऊन संतापाच्या भरात मुलीला संपवले. मुलगी बापाला विनवण्या करत होती, तरुण खोटं बोलतोय हे सांगत होती. मात्र बापाने तिचे काही ऐकले नाही.

हे सुद्धा वाचा

मुलीचा आरडाओरडा ऐकून घरातील भाडेकरुंना हत्येचा सुगावा लागल्याने त्यांनी मुलीच्या आईला फोनवर माहिती दिली. आईने तात्काळ घरी धाव घेतली. पतीने तिलाही मारहाण केली. यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.

Non Stop LIVE Update
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.