दहा लाख रुपये उकळले आणि बहिणीलाही नांदवत नव्हता, अखेर हताश झालेल्या भावाने केले ‘हे’ कृत्य

मुलीच्या सुखासाठी विनयच्या घरच्यांनी ईशानला 10 लाख रुपये दिले. मात्र पैसे दिल्यानंतरही ईशानने आपल्या पत्नीला माहेरीच ठेवले. गेल्या दोन वर्षापासून ईशानची पत्नी माहेरीच आहे.

दहा लाख रुपये उकळले आणि बहिणीलाही नांदवत नव्हता, अखेर हताश झालेल्या भावाने केले 'हे' कृत्य
मेव्हण्याला कंटाळून तरुणाची आत्महत्याImage Credit source: social
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 5:28 PM

फरीदकोट : मेव्हण्याला कंटाळून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील फरीदकोट येथे घडली आहे. विनय मनचंदा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी विनयने सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने आपण बहिणीच्या नवऱ्यामुळे आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मयत तरुणाच्या काकाच्या तक्रारीवरुन स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन वर्षापूर्वीच झाला होता बहिणीचा विवाह

विनयच्या लहान बहिणीचा अमृतसर येथील ईशान अरोरा याच्याशी दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर ईशानने विनयच्या कुटुंबीयांकडे दहा लाखांची मागणी केली. पैसै न दिल्यास बहिणीला परत घरी पाठवण्याची धमकी दिली.

मेव्हण्याने 10 लाख रुपये घेतले आणि बहिणीलाही नांदवत नव्हता

मुलीच्या सुखासाठी विनयच्या घरच्यांनी ईशानला 10 लाख रुपये दिले. मात्र पैसे दिल्यानंतरही ईशानने आपल्या पत्नीला माहेरीच ठेवले. गेल्या दोन वर्षापासून ईशानची पत्नी माहेरीच आहे. ईशान पत्नीला घरीही नेत नव्हता आणि दिलेले पैसेही परत करत नव्हता.

हे सुद्धा वाचा

वारंवार पैसे मागूनही ईशान पैसे परत देत नव्हता. पैसैही मिळत नव्हते आणि बहिणीलाही सासरी नेत नव्हता. यामुळे विनय तणावात होता. तणावातून बाहेर यावे यासाठी त्याच्या घरच्यांनी त्याला लुधियानाला त्याच्या काकांकडे पाठवले होते.

सुसाईड नोट लिहित विनयची आत्महत्या

काकांच्या घरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विनयने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने म्हटलं आहे की, ‘मी ईशान अरोराला आपल्या आत्महत्येसाठी कारणीभूत आहे. त्याने माझ्या कुटुंबासोबत फसवणूक केली आहे. मी आणखी सहन करु शकत नाही.’

ईशानविरोधात गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेत त्याआधारे ईशान अरोरा विरोधात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.