दिरासोबत हसून बोलणे पतीला पसंत नव्हते, वारंवार समजावूनही पत्नी ऐकत नव्हती; मग…

चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

दिरासोबत हसून बोलणे पतीला पसंत नव्हते, वारंवार समजावूनही पत्नी ऐकत नव्हती; मग...
प्रेमाला विरोध करणाऱ्या भावाला प्रियकराच्या मदतीने संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 1:49 PM

सिहोर : पत्नी दिरासोबत हसून बोलायची म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. रेखाबाई असे हत्या करण्यात आलेल्या 22 वर्षीय पत्नीचे नाव आहे. तर सिताराम भिलाला असे आरोपी पतीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पत्नीचे भावासोबत हसून बोलणे पसंत नव्हते

जामली गावात राहणारा सिताराम भिलाला याची पत्नी रेखाबाई ही आपल्या लहान भावाशी हसून बोलायची हे त्याला पसंत नव्हते. याबाबत त्याने वारंवार पत्नीला भावापासून दूर रहायला सांगितले. पण ती ऐकत नव्हती. यामुळे भावाचे आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय होता.

कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची हत्या

याच संशयातून त्याचे काल रात्री पत्नीसोबत भांडण झाले. यानंतर पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. जामली गावात एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती इछावर पोलिसांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

हे सुद्धा वाचा

पतीला पोलिसांकडून अटक

पोलिसांनी जेव्हा नातेवाईकांकडे चौकशी केली असता महिलेच्या पतीवर संशय व्यक्त केला. यानंतर पोलिसांनी पतीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता आधी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने सर्व गुन्हा कबूल केला. पत्नीचे आपल्या लहान भावासोबत हसून बोलणे आपल्याला पसंत नसल्याने आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.