पती बाहेर असण्याचा पत्नी फायदा घेत होती, एकेदिवशी भांडाफोड झाला; नंतर जे घडलं ते धक्कादायक होतं !

पती मजुरीचे काम करायचा. चार पैसे कमावण्साठी घरापासून दूर राहत होता. मात्र पत्नी याच गोष्टीचा फायदा घेत होती आणि नको ते करत होती. पण अखेर पतीच्या समोर ही बाब आलीच.

पती बाहेर असण्याचा पत्नी फायदा घेत होती, एकेदिवशी भांडाफोड झाला; नंतर जे घडलं ते धक्कादायक होतं !
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 2:15 PM

सीधी : मध्य प्रदेशात एक हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या पतीने तिच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना सीधी जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मयत हा आरोपीचा शेजारी असून, गेल्या अनेक दिवसापासून त्याचे आरोपीच्या पत्नीशी अनैतिक संबंध सुरु होते. मात्र आरोपी याबाबत अनभिज्ञ होता. अखेर ही बाब पतीच्या समोर आली आणि त्याचा संताप अनावर झाला. आरोपी मजुरीचे काम करतो. दादूलाल बैगा असे आरोपीचे नाव आहे.

पत्नीचे शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते

दादूलाल बैगा हा मजुरीच्या कामानिमित्त घराबाहेर असायचा. याचाच गैरफायदा घेत त्याच्या पत्नीचे शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंध सुरु होते. मात्र पतीला याबाबत काहीच माहिती नव्हती. गुरुवारी रात्री 12 वाजता पती अचानक घरी परतला. घरामध्ये शिरताच पत्नीला शेजाऱ्यासोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीला संताप अनावर झाला. यानंतर त्याने घरातील धारदार हत्याराने पत्नीचा प्रियकर राजरुप बैगावर जीवघेणा हल्ला केला.

पोलिसांकडून आरोपी अटक

या हल्ल्यात राजरुप गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत कसातरी तो त्याच्या घराजवळ पोहचला. त्याचा विव्हळण्याचा आवाज ऐकून त्याची आई घराबाहेर आली. राजरुपने आईला हल्ल्याची माहिती दिली. यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.