लग्नात डीजेवर नाचण्यावरुन वाद झाला, वरात संपताच तरुणाचा काटा काढला !

लग्नाची वरात निघाली होती. दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. नवरदेवाकडील मंडळी नववधूचे स्वागत करण्यात मग्न होती. मात्र वरात संपताच भयंकर घटना समोर आली.

लग्नात डीजेवर नाचण्यावरुन वाद झाला, वरात संपताच तरुणाचा काटा काढला !
वरातीत नाचण्यावरुन झालेल्या वादातून तरुणाला संपवलेImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 7:41 PM

सिवनी : मध्य प्रदेशातील सिवनी येथे लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादाक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पाच तरुणांचा सहभाग असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यानुसार आरोपीना अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. कुटुंबीय लवकरात लवकर आरोपींना पकडून कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. वरातीत नाचण्यावरून चांगलाच वाद झाला. वाद इतका गेला की हाणामारी झाली. याप्रकरणी झरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरीखुर्द गावात ही घटना घडली.

वरातीत वाद झाला, मग वरातीनंतर काटा काढला

बारघाट पोलीस ठाणे हद्दीतील मानेगाव येथून साहू समाजाची विवाह मिरवणूक बोरीखुर्द गावात आली होती. डीजेमध्ये नाचत असताना वरातीतील दोन तरुणांमध्ये वाद झाला. वरात संपल्यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात योगेश आगासे हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूरला रेफर करण्यात आले. मात्र योगेश आगासे याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दोन संशयितांना ताब्यात घेतले

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. दोन तरुणांना संशयाच्या आधारे ताब्यात घेतले आहे. तर अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा आणि इतर कारवाईनंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. योगेशच्या मृत्यूमुले त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.